Marathi e-Batmya

येत्या २४ तासात मुंबईसह या ठिकाणी कोसळणार अति अति मुसळधार पाऊस

मुंबई: प्रतिनिधी

आगामी २४ तासात मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड आदी भागात वादळी वाऱ्यासह अति अति मुसळधार पाऊस कोसळणार आहे. त्यामुळे नागरिकांनी कारणाशिवाय घराबाहेर पडू नका असा इशारा हवामान खात्याने आज एका ट्विटरच्या माध्यमातून दिला.

त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातही अति मुसळधार पाऊस कोसळणार आहे. याशिवाय विदर्भातही पुढील ४८ तास मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला.

 

Exit mobile version