जूनचा महिना उजाडला असून आता राज्यात मान्सूनचा पाऊस कोसळण्याचे संकेत भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजात व्यक्त केले. ९ आणि ११ जूनला कोकण आणि मध्य महाराष्ट्रात भारतीय हवामान खात्याने ऑंरेज अलर्ट जारी केला असून या हे तीन्ही दिवस मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाजही हवामान खात्यानेही जारी केला आहे.
तसेच हवामान खात्याने पुढील पाच दिवस मान्सून पावसाचा अंदाज व्यक्त केलेला असून राज्याच्या अनेक भागात मान्सूनने हजेरी लावणार असल्याचेही सांगितले आहे.
https://x.com/Hosalikar_KS/status/1799030152439189922
पुढील ३ ते ५ दिवस मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सिंधूदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि सातारा जिल्ह्यात अति-मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाजही व्यक्त केला आहे. तसेच हवामान खात्याने आँरेंज अलर्टही जारी केला आहे.
https://x.com/Hosalikar_KS/status/1799025241257361579
https://x.com/RMC_Mumbai/status/1799001844901146935
