Marathi e-Batmya

सोलापूर -चंद्रपूरात तापमान ४२ वर, तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक पाऊस

एकाबाजूला राज्यात लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने राजकिय वातावरण तापत असतानाच एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यातही निसर्गातील उष्मा भलताच वाढताना दिसत आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या एकूण सहाही महसूली विभागात कधी उष्णतेचा पारा कधी ४०-४२ पार जाताना दिसून येत आहे. तर काही भागात तुरळक सरींचा अंदाज व्यक्त करण्यात आहे.

आज सोलापूरात आज दिवसभरात ४३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. आणि विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात ४२.३ अशं सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक पावसाच्या सरी कोसळणार असल्याचाही अंदाज व्यक्त केला आहे. तर दुसऱ्याबाजूला राज्याच्या काही भागात दिवसभर वारे वहात राहिल्याने वातावरणातील उष्मा जाणवणार नसल्याचे हवामान खात्याने सांगितले.

त्यामुळे महाराष्ट्रातील दक्षिण भागात आणि मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागात रात्रीही वातावरण उष्ण राहणार असल्याचे संकेत दिले आहे. याशिवाय मुंबई आणि उपनगरातील तापमान कमाल ३८ अशांपर्यंत राहणार असले तरी काही ठिकाणी दमट तर काही तर काही ठिकाणी वातावरणात उष्ण वातावरण राहणार आहे.

Exit mobile version