Marathi e-Batmya

बजाजची फ्रीडम १२५ ही जगातील पहिली सीएनजी इंटिग्रेटेड मोटरसायकल लाँच

बजाज ऑटो या जगातील सर्वात व्हॅल्यूएबल टू-व्हीलर आणि थ्री-व्हीलर कंपनीने ‘फ्रीडम’ या जगातील पहिल्या सीएनजी मोटरसायकलची घोषणा केली आहे! या ग्राउंड ब्रेकिंग इनोव्हेशनमुळे, पेट्रोलवर चालणाऱ्या पारंपरिक मोटरसायकलसाठी वाजवी खर्चातील व पर्यावरणस्नेही पर्याय उपलब्ध होऊन टू-व्हीलरच्या उद्योगक्षेत्रात क्रांती घडून येणार आहे.

इंधनाच्या खर्चात अतुलनीय बचत होऊन अधिक चांगले जीवन जगण्याचे स्वातंत्र्य:

बजाज फ्रीडम सीएनजी मोटरसायकल इंधनाच्या खर्चात मोठ्या प्रमाणावर कपात करून बजाज फ्रीडमसारख्या पेट्रोल मोटरसायकलींच्या तुलनेने खर्चात सुमारे ५०%* बचत करते. फक्त २ किलो सीएनजी इंधन भरल्यावर २००+ किमीची रेंज मिळू शकणार आहे. या व्यतिरिक्त, या मोटरसायकलमध्ये २ लिटरची पेट्रोलची टाकीसुद्धा आहे. त्यामुळे ही रेंज अजून वाढते. सीएनजीची टाकी रिकामी झाली तरी अजून १३० किमी अंतर पार करता येऊ शकते. त्यामुळे अविरत प्रवासाची खात्री मिळते.

‘गो ग्रीन’चे स्वातंत्र्य :

सीएनजी कम्बशन प्रक्रियेत पेट्रोलच्या तुलनेने २६.७% कमी कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन होते. त्यामुळे हवामान बदलाला आळा घालण्यासाठी योगदान दिले जाते. या व्यतिरिक्त, सीएनजी वाहनांमधून MNHC’s(नॉन-मिथेन हायड्रोकार्बन) उत्सर्जित होण्याचे प्रमाण ८५% कमी आणि NOx (नायट्रोजन ऑक्साइड) उत्सर्जित होण्याचे प्रमाण ४३% कमी असते.

कम्फर्ट, सेफ्टी आणि सुविधाजनक फीचर्स

कारच्या तुलनेने मोटरसायकल कॉम्पॅक्ट आकाराची असल्याने सीएनजी मोटरसायकलची निर्मिती करणे आव्हानात्मक होते. बजाज फ्रीडम सीएनजी मोटरसायकलमध्ये इंटिग्रेटेड सीएनजी टँक आणि किट ट्रेलिस फ्रेममध्ये सुरक्षितपणे बसविण्यात आले आहे. काटेकोर टेस्टिंग करून याच्या सुरक्षेची खात्री करण्यात आली आहे. हॉरिझॉन्टली इनक्लाइन्ड इंजिन आणि लिंक-मोनो शॉक सिस्टिममुळे जागा ऑप्टिमाइझ (इष्टतम वापर) होते आणि स्टेबल राइड मिळते. या डिझाइनमध्ये ८२५mmची सॅडल हाइट आहे आणि ईझी ग्राउंड कॉन्टॅक्टसाठी मधला भाग निमुळता आहे. सीएनजी टाकी असूनही स्मार्ट वेट-सेव्हिंग उपाययोजनांमुळे पेट्रोल मोटरसायकलसारखीच सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी (गुरुत्वाकर्षण केंद्र) राखणे शक्य झाले आहे. त्यामुळे न्यूट्रल हँडलिंग आणि रायडर कॉन्फिडन्सची खात्री होते. मोनो-लिंक्ड टाइप सस्पेन्शनमुळे अधिक चांगला व्हील ट्रॅव्हल आणि कम्फर्ट मिळतो. त्यामुळे ही मोटरसायकल वेगवेगळ्या प्रकारच्या राइडिंग परिस्थितीसाठी सुयोग्य झाली आहे.

बजाज ऑटो हे इनोव्हेशनमध्ये पायोनिअर आहेत आणि विश्वासार्हता व काळाच्या कसोटीवर सिद्ध झालेल्या उत्पादनांचा वारसा त्यांना लाभलेला आहे. त्यामुळेच ते कॅटेगरी डिफाइनर्स म्हणून ओळखले जातात. बजाजने पंचवीस वर्षांपूर्वी पल्सर ही भारतातील पहिली मोटरसायकल सादर केली, साधारण याच कालावधीत बजाज आरई ही भारतातील पहिली सीएनजी थ्री-व्हीलर ते भारतात इलेक्ट्रिक स्कूटर सादर करणाऱ्या पहिल्या-वहिल्या कंपन्यांमध्ये बजाजचा समावेश होतो. बजाज पल्सर आता ५० देशांमध्ये निर्यात होते आणि २०+ देशांत ते मार्केट लीडर आहेत. आपल्या ७५ वर्षांच्या इतिहासात बजाजने मोटरसायकल तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण केले असून ॲडव्हान्स्ड फीचर्स सर्वसामान्यांना उपलब्ध करून दिली आहेत आणि ‘फ्रीडम’च्या लाँचसह त्यांची ही वचनबद्धता पुढे सुरू राहिली आहे.

ही ऑल-न्यू बजाज फ्रीडम तीन व्हेरिअंटमध्ये उपलब्ध आहे :

· Freedom 125 NG04 Disc LED ₹१,१०,०००/- (एक्स-शोरूम दिल्ली) या किमतीत उपलब्ध आहे

· Freedom 125 NG04 Drum LED ₹१,०५,०००/- (एक्स-शोरूम दिल्ली) या किमतीत उपलब्ध आहे

· Freedom 125 NG04 Drum ₹९५,०००/- (एक्स-शोरूम दिल्ली) या किमतीत उपलब्ध आहे.

अशाच कॅटेगरीमधील मोटरसायकलींशी तुलना करता होणारी बचत.

या प्रसंगी बजाज ऑटो लि.चे कार्यकारी संचालक राकेश शर्मा म्हणाले, ” या प्रसंगी बजाज ऑटो लि.चे कार्यकारी संचालक राकेश शर्मा म्हणाले, “बजाज फ्रीडम १२५ मध्ये बजाज ऑटो लि.चे संशोधन व विकास आणि निर्मितीमधील प्रावीण्य दिसून येते. इनोव्हेशनच्या माध्यमातून बजाज ऑटो लि.ने इंधनाचा वाढणारा खर्च कमी करणे आणि वाहतुकीमुळे पर्यावरणावर होणारा परिणाम कमी करणे, ही दोन्ही आव्हाने हाताळली आहेत. हा उपक्रम, भारत सरकारच्या स्वच्छ इंधनाचा वापर करण्याच्या आणि परकीय चलन वाचवण्याची गरज लक्षात घेऊन सीएनजी नेटवर्क उभारणीसाठीच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांशी सुसंगत आहे. टू-व्हीलर ग्राहकांपैकी ७५% ग्राहकांसाठी इंधन कार्यक्षमता हा (फ्युएल एफिशिअन्सी) महत्त्वाचा घटक आहे. अशा सर्व ग्राहकांसाठी फ्रीडम १२५ ची निर्मिती करण्यात आली आहे आणि ‘राइड टू चेंज’साठी आम्ही त्यांना आमंत्रित करत आहोत.”

Exit mobile version