Marathi e-Batmya

राज्याच्या तिजोरीत किती जमा आणि खर्च येणार तर तूट किती? वाचा

मुंबईः प्रतिनिधी

मागील वर्षात कोरोना लॉकडाऊनमुळे राज्यातील सर्वच वित्तीय केंद्रे बंद राहिली. त्यामुळे राज्याच्या महसूलात १ लाख कोटी रूपयांची तूट आली. तरीही यंदाच्या वर्षी ३ लाख ६८ हजार ९८७ कोटी रूपये अंदाजीत महसूली जमेचे उद्दिष्ट असलेला आणि १० हजार २२५ कोटी तर राजकोषीय ६६ हजार ६४१ कोटी रूपयांच्या तूटीचा  आणि ४ लाख ४ हजार ३८५ कोटी रुपये अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत सादर केला.

सन २०२१-२२ मध्ये जिल्हा वार्षिक योजनेसाठी ११ हजार ३५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार असून यापूर्वी ही तरतूद ९ हजार कोटी रूपयांची होती. त्याचबरोबर सन २०२१-२२ मध्ये कार्यक्रम खर्चाची रक्कम १ लाख ३० हजार कोटी रुपये एवढी निश्चित राहणार असून त्यामध्ये अनुसूचित जाती उपयोजनेसाठी १० हजार ६३५ कोटी रुपये व आदिवासी विकास उपयोजनेच्या ९ हजार ७३८ कोटी रुपये नियतव्ययाचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.

सन २०२०-२१ च्या अंदाजपत्रकात महसूली जमा ३ लाख ४७ हजार ४५७ कोटी रुपये अपेक्षित असून यावर्षी केंद्र शासनाकडून प्राप्त होणाऱ्या राज्य हिश्श्याच्या कराच्या रकमेत १४ हजार ३६६ कोटी रूपये घट झाली आहे. महसूली जमेचे सुधारीत उद्दीष्ट २ लाख ८९ हजार ४९८ कोटी रुपये निश्चित करण्यात आले असून सन २०२०-२१ च्या एकूण खर्चाचे अर्थसंकल्पीय अंदाज ४ लाख ४ हजार ३८५ कोटी रुपये, सुधारीत अंदाज ३ लाख ७९ हजार ५०४ कोटी रुपये इतके असल्याचे त्यांनी सांगितले.

सन २०२१-२२ च्या अर्थसंकल्पामध्ये महसुली जमा ३ लाख ६८ हजार ९८७ कोटी रुपये व महसुली खर्च ३ लाख ७९ हजार २१३ कोटी रूपये अंदाजित आहेत. १० हजार २२६ कोटी रुपये महसूली तूट येणार असून अर्थव्यवस्थेला गती देणे व रोजगार निर्मितीकरीता मुलभूत बाबीवर खर्च करण्यासाठी ५८ हजार ७४८ कोटी रुपयांची तरतूद तर राजकोषीय तूट ६६ हजार ६४१ कोटी रुपयांची येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अर्थसंकल्पातील ठळक वैशिष्टे

आरोग्यसेवा

कृषी विकास

जलसंपदा

मदत व पुनर्वसन

रस्ते विकास

रेल्वे विकास

ग्रामविकास

मनुष्यबळ विकास

मुंबईच्या विकासाचे प्रकल्प

 प्रवासासाठी दळणवळण सुविधा-

मुंबईतील पर्यटन आकर्षणे

मुंबई येथील पायाभूत विकास प्रकल्प

              उद्योग, उर्जा व कामगार

महिला व बालविकास

कामगार

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य

आदिवासी विकास

इतर मागास बहुजन कल्याण

तीर्थक्षेत्र विकास आणि स्मारके

Exit mobile version