Marathi e-Batmya

रेटिंग वाढवल्याने आयटी शेअर्स उसळले

नई दिल्लीः प्रतिनिधी

जागतिक वित्तीय सेवा कंपनी मॉर्गन स्टॅनलेने आयटी कंपन्यांचे रेटिंग वाढवल्याने बुधवारी या कंपन्यांच्या शेअर्सने मोठी उसळी घेतली. इन्फोसिस आणि टीसीएस या आयटी कंपन्यांचे शेअर्स आता ५२ आठवड्यांच्या उच्चांकावर पोचले आहेत.
मॉर्गन स्टॅनलेने इन्फोसिस, टेक महिंद्रा, परसिस्टेंस, साइंट आणि एचसीएल टेक आदी आयटी कंपन्यांचे रेटिंग वाढवून ओव्हरवेट श्रेणीमध्ये त्यांच्या समावेश केला आहे. आयटी कंपन्यांकडून २७ टक्के परतावा मिळण्याचा अंदाज मॉर्गन स्टॅनलीने वर्तवला आहे. त्य़ामुळे बुधवारी शेअर बाजारात इंफोसिस (२.८५%), टीसीएस (२.०६%), माइंड ट्री (१.०१%) आणि एचसीएल टेक (०.५८%) या कंपन्यांच्या शेअर्सने चांगली वाढ नोंदवली. निफ्टी आयटी इंडेक्सही १.२७ टक्क्याने वाढला आहे. टीसीएसच्या शेअर्सने २ हजार ९२५ रुपयांची नवी उच्चांकी पातळी गाठली आहे. तर इन्फोसिस १ हजार १६१ रुपयांवर पोचला आहे.
सेन्सेक्स उच्चांकावर
सेन्सेक्सने बुधवारी ३४ हजार ९८९ अंकाचा नवीन उच्चांक नोंदवला आहे. बुधवारी भारतीय शेअर बाजारांची सुरूवात सुस्तच झाली. मात्र, त्यानंतर मोठी चढ–उतार दिसून येत होती. इन्फोसिस, टीसीएस, आयसीआयसीआई बँक, एसबीआई, पावरग्रिड, आईटीसी आदी कंपन्यांचे शेअर्समध्ये झालेल्या खरेदीने बाजारात तेजी आली.

Exit mobile version