Breaking News

लीला हॉटेलच्या मुख्य कंपनीचाही आयपीओ आता बाजारात सेबीकडे कागदपत्रे दाखल ,५००० हजार कोटी रूपयांचा आयपीओ आणणार

शेअर बाजारात विक्रमी वाढ दिसून येत आहे, ज्यामुळे अनेक कंपन्यांना प्रारंभिक सार्वजनिक ऑफरिंगद्वारे अर्थात आय़पी IPOs आणून या संधीचा फायदा घेत आहेत. काही नूतनीकरणीय आणि बिगर बँकिंग क्षेत्रातील कंपन्यांच्या यशस्वी आयपीओ IPO नंतर, हॉटेल शृंखला श्लॉस Schloss बेंगलोर आता तिचा आयपीओ आणण्याच्या तयारीत आहे.

लीला पॅलेसेस, हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स चालवणाऱ्या श्लोस बेंगलोरने सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया अर्थात सेबी SEBI कडे ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) दाखल केला आहे.

श्लॉस Schloss बेंगलोर अंदाजे रु. ५,००० कोटी उभारण्याचा विचार करत आहे. यशस्वी झाल्यास, भारतीय शेअर बाजारातील हॉटेल क्षेत्रातील हा आजपर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ IPO असेल. लीला पॅलेसेसची स्थापना १९८६ मध्ये सीपी कृष्णन नायर यांनी केली होती आणि सध्या ब्रुकफील्ड ॲसेट मॅनेजमेंटच्या मालकीची आहे.

श्लॉस ३,००० कोटी रुपयांचे नवीन शेअर्स जारी करत आहे, तर ब्रूकफील्ड ॲसेट मॅनेजमेंटशी संलग्न असलेले शेअरहोल्डर प्रोजेक्ट बॅलेट बेंगलोर होल्डिंग्स (DIFC) २,००० कोटी रुपयांचे शेअर्स विकत आहेत.

मार्च २०१९ मध्ये, ब्रुकफील्डने दिल्ली, बेंगळुरू, उदयपूर आणि चेन्नई येथील चार लीला पॅलेस मालमत्ता जेएम फायनान्शियल ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीकडून ३,९५० कोटी रुपयांना विकत घेतल्या. कंपनी सध्या भारतातील १० शहरांमध्ये १२ हॉटेल्स चालवते आणि २०२८ पर्यंत आठ नवीन हॉटेल्स सुरू करण्याची योजना आखत आहे.

श्लॉसचा एकत्रित वार्षिक तोटा मार्च २०२४ मध्ये ६१.६८ कोटी रुपयांवरून २.१३ कोटी रुपयांपर्यंत कमी झाला. हॉटेल मालक आणि ऑपरेटरसाठी प्रति उपलब्ध खोलीचा महसूल (RevPAR), मार्च २०२४ मध्ये वर्षानुवर्षे सुमारे २३ टक्क्यांनी वाढून ९,५९२ रुपये झाला. भारतीय हॉस्पिटॅलिटी मार्केट २०२४ मध्ये $२४.६ अब्ज वरून २०२९ पर्यंत $३१ अब्जपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे.

आयपीओचे व्यवस्थापन ११ गुंतवणूक बँकांकडून केले जात आहे. त्यात कोटक महिंद्रा कॅपिटल, जेएम फायनान्शियल, बोफा सिक्युरिटीज, मॉर्गन स्टॅनले, जेपी मॉर्गन, ॲक्सिस कॅपिटल, सिटी, आयसीआयसीआय सिक्युरिटीज, आयआयएफएल कॅपिटल, मोतीलाल ओसवाल आणि एसबीआय कॅप्स यांचा समावेश आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत