Marathi e-Batmya

अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल जाहीरः जाणून घ्या

राज्याचा अर्थसंकल्पिय उद्या ११ मार्च रोजी विधानसभेत सादर केला जाणार आहे. तत्पूर्वी राज्यातील आर्थिक चित्र स्पष्ट व्हावे या दृष्टीकोनातून राज्य सरकारकडून आर्थिक सर्व्हेक्षण अहवाल प्रकाशित करण्यात येतो. त्यानुसार आज आर्थिक पाहणी अहवाल विधानसभेत सादर कऱण्यात आला. या आर्थिक पाहणी अहवाल संक्षिप्त स्वरूपात खालील प्रमाणे…

महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2021-22 ठळक वैशिष्ट्ये

Ø सांकेतिक देशांतर्गत स्थूल उत्पन्नात राज्याचा सरासरी हिस्सा  सर्वाधिक (14.2 टक्के) आहे

Ø सन 2021-22 च्या पूर्वानुमानानुसार दरडोई राज्य उत्पन्न ` 2,25,073 अपेक्षित आहे

ii 

दरडोई राज्य उत्पन्न आणि  सांकेतिक स्थूल राज्य उत्पन्न
                                                                                                                                                       (पायाभूत वर्ष  2011-12)
तपशील 2011-12 2012-13 2013-14 2014-15 2015-16 2016-17 2017-18 2018-19+++ 2019-20++ 2020-21+ 2021-22$
सांकेतिक स्थूल राज्य उत्पन्न
(` कोटी)
 

12,80,369

 

14,59,629

 

16,49,647

 

17,79,138

 

19,66,225

 

21,98,185

 

23,52,782

 

25,67,897

 

27,34,552

 

27,11,685

 

31,97,782

दरडोई

राज्य उत्पन्न
(`)

 

99,597

 

1,12,092

 

1,25,261

 

1,32,836

 

1,46,815

 

1,63,726

 

1,72,663

 

1,86,074

 

1,96,100

 

1,93,121

 

2,25,073

+++ तिसरे सुधारित अंदाज          ++ दुसरे सुधारित अंदाज            + पहिले सुधारित अंदाज                            $ पुर्वानुमान

 

संयुक्त राष्ट्रसंघाचा वर्ल्ड इकॉनॉमिक सिच्युएशन ॲन्ड प्रॉस्पेक्ट्स-2022 अहवालानुसार

सन 2021 करिता जागतिक स्थूल उत्पादन व देशांतर्गत उत्पन्नातील वाढ

तपशील जागतिक विकसित अर्थव्यवस्था विकसनशील अर्थव्यवस्था अल्प विकसित अर्थव्यवस्था अमेरीकेची संयुक्त राज्ये जपान चीन भारत महाराष्ट्र$
स्थूल उत्पादनाचे वृद्धिदर (टक्के) 5.5 4.8 6.4 1.4 5.5 2.2 7.8 9.0 12.1^
$ सन 2021-22 करिता       ^ अर्थ व सांख्यिकी संचालनालय, महाराष्ट्र शासन यांचेकडील पुर्वानुमान
सन 2020-21 करिता निवडक राज्यांचे दरडोई उत्पन्न
(पायाभूत वर्ष  2011-12)
तपशील हरियाणा कर्नाटक तेलंगणा तामीळनाडू महाराष्ट्र आंध्र प्रदेश मध्य प्रदेश उत्तर प्रदेश
दरडोई राज्य उत्पन्न (`) 2,39,535 2,36,451 2,34,751 2,25,106 1,93,121 1,70,215 1,04,894 65,338

iii


Ø राज्यात‍‍ दि.31 डिसेंबर, 2021 रोजी एकूण 1,485 शिवभोजन केंद्रे कार्यरत आहेत. योजनेच्या सुरुवातीपासून माहे जानेवारी, 2022 पर्यंत, एकूण 8.24 कोटी शिवभोजन थाळींचे वितरण करण्यात आलेØ सन 2021-22 मध्ये प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत अनुज्ञेय असलेल्या अन्नधान्यासह प्रति व्यक्ती प्रतिमाह पाच किलो अन्नधान्य विनामूल्य वितरित करण्यात येत आहे
Ø अर्थसंकल्पीय अंदाज 2021-22 नुसार राजकोषीय तुटीचे स्थूल राज्य उत्पन्नाशी प्रमाण 2.1 टक्के तसेच ऋणभाराचे स्थूल राज्य उत्पन्नाशी प्रमाण 19.2 टक्के आहे

Ø वार्षिक कार्यक्रम 2021-22

·      वार्षिक कार्यक्रम 2021-22 करिता एकूण ` 1,30,000 कोटी निधी प्रस्तावित करण्यात आला असून त्यापैकी जिल्हा योजनांचा हिस्सा ` 15,622 कोटी आहे

Ø पंधराव्या वित्त आयोगाच्या शिफारशींनुसार सहाय्यक अनुदाने –

·   सन 2021-22 ते 2025-26 या कालावधीत एकूण ` 3,37,252 कोटी रक्कमेची वित्तीय संसाधने राज्यास हस्तांतरित होणे अपेक्षित असून त्यापैकी ` 70,375 कोटी सहाय्यक अनुदाने अपेक्षित आहेत

·   राज्यास प्राप्त होणाऱ्या सहाय्यक अनुदानांपैकी ` 41,391 कोटी अनुदान हे स्थानिक स्वराज्य संस्थांकरिता प्राप्त होणे अपेक्षित असून त्यापैकी ` 7,067 कोटी अनुदान ग्रामीण तसेच नागरी भागातील आरोग्य व्यवस्थेच्या बळकटीकरणाकरिता राखीव आहे

·   पंधराव्या वित्त आयोगाच्या शिफारशींनुसार राज्याला केंद्र शासनाकडून सन 2021-22 ते 2025-26 या कालावधीत
राज्य आपत्ती जोखिम व्यवस्थापन निधी अंतर्गत सुमारे ` 17,803 कोटी अनुदान प्राप्त होणे अपेक्षित आहे

iv

Ø देशातील अनुसूचित वाणिज्यिक बँकांच्या एकूण ठेवी व स्थूल कर्जे यामध्ये महाराष्ट्रातील बँकांचा हिस्सा दि.31 मार्च, 2021 रोजी अनुक्रमे 19.8 टक्के व 26.2 टक्के होता

Ø प्रधानमंत्री जन धन योजनेअंतर्गत दि.19 जानेवारी, 2022 पर्यंत, राज्यात एकूण 3.11 कोटी खाती उघडण्यात आली असून ग्रामीण/ निम-नागरी क्षेत्राचा हिस्सा 56 टक्के होता

राज्यातील  पाऊस व पीक उत्पादन
तपशील 2011-12 2012-13 2013-14 2014-15 2015-16 2016-17 2017-18 2018-19 2019-20 2020-21
पावसाची  सरासरीच्या

तुलनेत टक्केवारी

102.3 90.3 124.6 70.2 59.4 94.9 84.3 73.6 112.6 113.4
पीक उत्पादन (‘000 मे.टन)$
तृणधान्ये 10,276 8,667 10,677 9,259 7,210 12,646 10,944 7,947 9,218 12,201
कडधान्य 2,225 2,262 3,114 2,019 1,545 4,584 3,684 2,683 3,849 4,444
एकूण अन्नधान्ये 12,501 10,929 13,791 11,278 8,755 17,230 14,628 10,630 13,067 16,646
तेलबिया 4,485 5,087 5,294 2,850 2,436 5,113 4,208 4,885 5,178 6,719
ऊस 86,733 69,648 76,901 84,699 73,680 54,237 83,138 89,771 69,313 1,11,642
कापूस (रुई)@ 7,200 7,655 8,834 7,000 7,500 10,755 6,094 6,593 6,639 10,110
फळे 10,538 9,785 13,458 11,090 9,750 10,630 11,729 10,778 12,624 12,230
भाजीपाला 8,778 8,008 10,162 8,783 9,452 10,520 12,307 11,472 13,043 15,106
$ खरीप, रब्बी  आणि उन्हाळी अंतर्भूत                    @  170 किलोची एक गासडी याप्रमाणे कापसाचे उत्पादन ‘000 गासड्यांमध्ये
टिप :  सन 2020-21 करिता पीक उत्पादनाची आकडेवारी अंतिम अंदाजांवर आधारीत आहे

 

Ø   सेंद्रीय शेती उत्पादनात अखिल भारतात मध्यप्रदेश नंतर राज्य (22 टक्के हिस्सा) दुसऱ्या क्रमांकावर आहे. सन 2020-21 मध्ये राज्यातून 1.26 लाख मे.टन सेंद्रीय शेती उत्पादनाची  निर्यात झाली

Ø   महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ति योजना 2019 च्या सुरुवातीपासून दि.22 डिसेंबर, 2021 पर्यंत 31.71 लाख लाभार्थी शेतकऱ्यांना ` 20,243 कोटी रकमेचा लाभ देण्यात आला

Ø   डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेअंतर्गत राज्य शासनाने माहे एप्रिल, 2021 पासून ` तीन लाख रकमेपर्यंतच्या कर्जास व्याजदराचे अनुदान एक टक्क्यावरुन तीन टक्के  केले आहे

v

Ø माहे मार्च ते माहे मे, 2021 कालावधीत अवकाळी पाऊस, गारपिट आणि चक्रीवादळ यामुळे 31 जिल्ह्यांमधील बाधित झालेल्या सुमारे 0.91 लाख हेक्टर कृषिक्षेत्राकरीता ` 122.26 कोटी नुकसान भरपाई मंजूर केली. माहे मे, 2021 मध्ये तौक्ते चक्रीवादळामुळे

Ø 17 जिल्ह्यांमधील बाधित झालेल्या सुमारे 0.17 लाख हेक्टर कृषिक्षेत्राकरीता ` 72.35 कोटी नुकसान भरपाई मंजूर केली.

Ø माहे जुलै, 2021 मध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे 24 जिल्ह्यांमध्ये सुमारे 4.43 लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले व त्याकरीता

Ø ` 365.67 कोटी नुकसान भरपाई मंजूर केली. माहे ऑगस्ट ते सप्टेंबर, 2021 या कालावधीत राज्यातील 28 जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी/ पुरामुळे बाधित झालेल्या सुमारे 48.38 लाख हेक्टर कृषिक्षेत्राकरीता ` 3,766.35 कोटी नुकसान भरपाई मंजूर केली.

vi

Ø मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0 अंतर्गत  माहे जून, 2020 ते माहे डिसेंबर, 2021 मध्ये राज्यात ` 1.88 लाख कोटी गुंतवणूक व  3.34लाख अपेक्षित रोजगार असलेले प्रस्ताव प्राप्त झाले

Ø महाराष्ट्र इलेक्ट्रीक व्हेईकल प्रोत्साहन धोरण, 2018 अंतर्गत पाच इलेक्ट्रीक वाहन उत्पादन घटक आणि एका बॅटरी उत्पादन घटकाकडून ` 8,420 कोटी प्रस्तावित गुंतवणुकीचे प्रस्ताव प्राप्त झाले असून त्यामध्ये 9,500 रोजगार निर्मिती अपेक्षित आहे

Ø माहे ऑक्टोबर, 2021 अखेर राज्यात 10,785 स्टार्ट-अप होते

Ø पर्यटन उद्योगाला चालना देण्यासाठी माहे मार्च, 2021 मध्ये कॅराव्हॅन धोरण आणि माहे ऑगस्ट, 2021 मध्ये साहसी पर्यटन उपक्रम धोरण राज्याने जाहीर केले

Ø श्री एकवीरा देवी, कार्ला येथे फ्युनिक्युलर रेल्वे/ रोपवे आणि पुणे जिल्ह्यातील राजगड किल्ला येथे रोपवे उभारण्याकरिता सामंजस्य करार करण्यात आला

Ø माहे नोव्हेंबर, 2021 मध्ये राज्याने वैद्यकीय आणि आरोग्य पर्यटनाला चालना देण्यासाठी बांगलादेश आणि ओमान या देशांसोबत सामंजस्य करार केले

vii

Ø अंदाजित किंमत ` 17,843 कोटी असलेला मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प प्रगतीपथावर आहे

Ø मुंबई किनारा रस्ता प्रकल्प (दक्षिण) (अंदाजित किंमत ` 12,721 कोटी) प्रगतीपथावर असून माहे सप्टेंबर, 2021 अखेर सुमारे
40 टक्के काम पूर्ण झाले

Ø मुंबई नागरी वाहतूक प्रकल्प टप्पा 2 अंतर्गत ठाणे-दिवा रेल्वे मार्गाच्या अतिरिक्त पाचवी व सहावी मार्गिका कार्यान्वित झाल्या

Ø मुंबई मेट्रो रेल्वे प्रकल्पाअंतर्गत दहिसर ते डी. एन. नगर (मेट्रो लाईन 2A) आणि अंधेरी (पू.) ते दहिसर (पू.) (मेट्रो लाईन 7) चे काम अंतिम टप्प्यात आहे

Ø कुलाबावांद्रेसीप्झ (मेट्रो लाईन 3) अंदाजित किंमत ` 33,406 कोटी, वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडवली (मेट्रो लाईन 4) अंदाजित किंमत ` 14,549 कोटी,  कासारवडवली-गायमुख (मेट्रो लाईन 4A) अंदाजित किंमत ` 949 कोटी, ठाणे-भिवंडी-कल्याण (मेट्रो लाईन 5) अंदाजित किंमत ` 8,417 कोटी, स्वामी समर्थ नगर-विक्रोळी (मेट्रो लाईन 6) अंदाजित किंमत
` 6,716 कोटी, दहिसर (पू.)-मिरा भाईंदर आणि अंधेरी (मेट्रो लाईन 9) अंदाजित किंमत ` 6,607 कोटी असलेली कामे प्रगतीपथावर

Ø नवी मुंबई मेट्रो रेल्वे प्रकल्प व पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्प यांचे काम प्रगतीपथावर आहे

Ø नागपूर मेट्रो  रेल्वे प्रकल्पाचे  काम अंतिम टप्प्यात असून या प्रकल्पामधील खापरी ते कस्तुरचंद पार्क (उत्तर- दक्षिण मार्ग) आणि लोकमान्य नगर ते सीताबर्डी ( पूर्व-पश्चिम मार्ग) जनतेसाठी खुले झाले

Ø नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (अंदाजित किंमत ` 14,179 कोटी)  विकसनाचे काम सुरू

Ø   सन 2019 मध्ये जन्मदर, मृत्यूदर व अर्भक मृत्यूदर हे अनुक्रमे 15.3, 5.4 व 17 होते

Ø   सन 2018 मध्ये पाच वर्षाखालील बालकांचा मृत्यूदर, नवजात शिशु मृत्यूदर व एकूण जननदर हे अनुक्रमे 22, 13 व 1.7 होते

Ø   सन 2016-18 मध्ये माता मृत्यूप्रमाण 46 होते

viii

Ø दि.30 सप्टेंबर, 2020 रोजी मुलीमुले असमानता निर्देशक प्राथमिककरिता 0.89, उच्च प्राथमिककरिता 0.88, माध्यमिककरिता 0.86 व उच्च माध्यमिककरिता 0.87 आहे

Ø एकात्मिक बाल विकास सेवा कार्यक्रमाअंतर्गत कोविड-19 महामारीमुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांच्या नावे
` पाच लाख मुदत ठेवीच्या स्वरुपात अर्थसहाय्य देण्यात आले. सन 2021-22 मध्ये माहे नोव्हेंबरपर्यंत 397 लाभार्थी बालके होती

Exit mobile version