Marathi e-Batmya

शून्य शिल्लक खाते उघडण्याची या सरकारी बँकेत संधी

खाजगी किंवा सरकार बँकेत बँकेत बचत खाते उघडताना खात्यातील किमान शिल्लक रक्कमची मर्यादा पाळावी लागते. खात्यातील शिल्लक किमान रकमेपेक्षा कमी असल्यास बँका काही रक्कम दंड आकारतात. मात्र आता तुमच्यासाठी एक दिलासादायक बातमी आहे. आता बचत खात्यात किमान शिल्लक ठेवण्याच्या कटकटीपासून ग्राहकांची सुटका होईल.

देशातील एक सरकारी बँक ग्राहकांना शून्य शिल्लक बचत खाते उघडण्याची संधी देत असून या बँकेत तुम्ही आयुष्यभर शून्य शिल्लक ठेवून खाते उघडू शकता. तसेच या खात्याअंतर्गत क्रेडिट आणि डेबिट कार्ड देखील जारी जाईल. अशा स्थितीत खात्यातील किमान शिल्लक ठेवण्याची गरज पडणार नाही. सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदामध्ये तुम्हाला लाइफ टाइम शून्य शिल्लक खाते उघडण्याची सुविधा मिळत आहे.

सध्या बँक ऑफ बडोदा ‘बीओबी के संग तोहार की उमंग’ नावाची मोहीम राबवत आहे. या अंतर्गत लाइफ टाइम झिरो बॅलन्स खाते उघडले जात आहे. बँकेने BoB LITE बचत खाते सुरू केले असून या अंतर्गत खातेदाराला लाइफ टाइम शून्य शिल्लक अर्थात झिरो बॅलन्स सेव्हिंग बँक खात्याची सुविधा दिली जाईल आणि ग्राहकांची इच्छा असल्यास आयुष्यभर मोफत RuPay प्लॅटिनम डेबिट कार्डची सुविधेचा देखील लाभ घेऊ शकतात. त्यांना फक्त तिमाही सरासरी शिल्लक स्वरूपात खात्यात एक छोटी रक्कम ठेवावी लागेल.

 

Exit mobile version