Marathi e-Batmya

या ५ कंपन्यांचे शेअर्स पुढील आठवड्यात लिस्ट होणार

पुढील आठवड्यात शेअर बाजारात किमान ५ कंपन्यांचे शेअर्स लिस्ट होणार आहेत. विशेष बाब म्हणजे ग्रे मार्केट या पाच आयपीओचे लिस्टींग सकारात्मक म्हणजेच नफ्यासह होण्याचे संकेत देत आहे. या आयपीओंबद्दल जाणून घेऊया.

1. मनोज वैभव जेम्स आयपीओ
या कंपनीचे शेअर्स ३ ऑक्टोबर रोजी शेअर बाजारात सूचिबद्ध होतील. बाजार तज्ञांच्या मते, शुक्रवार, २९ सप्टेंबर रोजी शेअर्स ग्रे मार्केटमध्ये ३ टक्के किंवा सुमारे ६ रुपयांच्या प्रिमियमने आयपीओ किमतीपेक्षा ट्रेडिंग करत होते.

2. डिजीकोर स्टुडिओ
या कंपनीचे शेअर्स ४ ऑक्टोबर रोजी लिस्ट होतील. शुक्रवार, २९ सप्टेंबर रोजी शेअर्स ग्रे मार्केटमध्ये ५३ टक्के किंवा सुमारे ९० रुपयांच्या प्रीमियमवर व्यवहार करत होते.

3. जेएसडब्ल्यू इन्फ्रास्ट्रक्चर जिंदाल ग्रुपच्या या कंपनीचे शेअर्स ४ ऑक्टोबरला लिस्ट होतील. तज्ञांच्या मते, शुक्रवार, २९ सप्टेंबर रोजी शेअर्स ग्रे मार्केटमध्ये २१ टक्के किंवा २१ रुपयांच्या प्रीमियमने व्यवहार करत होते.

4. साक्षी मेडटेक
या कंपनीचे शेअर्स ६ ऑक्टोबर रोजी लिस्ट होतील. साक्षी मेडटेकचे शेअर्स
२९ सप्टेंबर रोजी ग्रे मार्केटमध्ये आयपीओ किमतीपेक्षा २६ टक्के किंवा २५ रुपयांच्या प्रीमियमने व्यवहार करत होते.

5. इंस्पायर फिल्म्स
इंस्पायर फिल्म्सचे शेअर्स ६ ऑक्टोबर रोजी शेअर बाजारात लिस्ट होतील. बाजार तज्ञांच्या मते, शुक्रवार, २९ सप्टेंबर रोजी शेअर्स ग्रे मार्केटमध्ये ३१ टक्के किंवा सुमारे १८ रुपयांच्या प्रिमियमने ट्रेडिंग करत होते.

Exit mobile version