Marathi e-Batmya

राज्यात दुपटीहून अधिक बाधित बरे होवून घरी, तर ७४ ओमायक्रॉनचे रूग्ण

मराठी ई-बातम्या टीम

दोन दिवसांपूर्वी ६ हजारावर आलेली कोरोनाबाधितांची संख्या आता ५ हजारावर आली असून ५ हजार ४५५ इतके बाधित आज आढळून आले आहेत. तर १४ हजार ६३५ रूग्ण बरे होवून घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.३४ % एवढे झाले आहे. राज्यात आज ६३ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८२ % एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७ कोटी ६१ हजार ६९ हजार ६२६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८ लाख ३५ हजार ०८८ (१०.२९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६ लाख १० हजार ७१८ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर २,३९२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

ओमायक्रॉन सर्वेक्षण विषयक माहिती –

आज राज्यात ७६ ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत.  हे सर्व रुग्ण राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने रिपोर्ट केले आहेत. रुग्णांचा रुग्णांचा तपशील खालीलप्रमाणे असून पुणे मनपा- ४६, अमरावती – १२, जालना- ८, पुणे ग्रामीण -४, वर्धा- ३, सिंधुदुर्ग, अहमदनगर आणि इतर राज्य – प्रत्येकी- १ असे आढळून आले आहे.

राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

अ.क्र जिल्हा/महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
१ मुंबई महानगरपालिका ३६७ १०५२४९५ १ १६६७९
२ ठाणे २१ ११७७८८ ० २२६६
३ ठाणे मनपा ५७ १८८७८८ १ २१५०
४ नवी मुंबई मनपा ५१ १६५९८६ १ २०७७
५ कल्याण डोंबवली मनपा ३२ १७५८९७ ० २९५२
६ उल्हासनगर मनपा १० २६४४२ ० ६६६
७ भिवंडी निजामपूर मनपा ३ १३११७ ० ४९१
८ मीरा भाईंदर मनपा ११ ७६४६८ ० १२२०
९ पालघर २८ ६४२८२ १ १२३९
१० वसईविरार मनपा १५ ९८७७६ ० २१५१
११ रायगड १०७ १३७७०१ ० ३४४२
१२ पनवेल मनपा ३६ १०५६३७ १ १४६८
ठाणे मंडळ एकूण ७३८ २२२३३७७ ५ ३६८०१
१३ नाशिक १९५ १८२५६६ ४ ३७९९
१४ नाशिक मनपा १३१ २७७४३५ ९ ४७३७
१५ मालेगाव मनपा ० ११००४ ० ३४४
१६ अहमदनगर ४३२ २९४३०९ ० ५५६६
१७ अहमदनगर मनपा ९१ ७९८४० ० १६४३
१८ धुळे १८ २८२०४ ० ३६४
१९ धुळे मनपा ११ २२२२७ ० २९५
२० जळगाव २३ ११३६६७ ० २०६४
२१ जळगाव मनपा ४ ३५५२६ ० ६६०
२२ नंदूरबार ५४ ४६१४४ ० ९५३
नाशिक मंडळ एकूण ९५९ १०९०९२२ १३ २०४२५
२३ पुणे ३०७ ४२२६१८ ८ ७१००
२४ पुणे मनपा ७१८ ६७३९१७ ११ ९४१२
२५ पिंपरी चिंचवड मनपा ३०६ ३४५०२९ ० ३५७३
२६ सोलापूर ८८ १८९३११ १ ४२१७
२७ सोलापूर मनपा ६९ ३७०४१ १ १५१७
२८ सातारा ९० २७७३१६ ३ ६६४७
पुणे मंडळ एकूण १५७८ १९४५२३२ २४ ३२४६६
२९ कोल्हापूर ३६ १६१८९० १ ४५६६
३० कोल्हापूर मनपा ३५ ५८१५० १ १३२२
३१ सांगली ९३ १७४०७७ ० ४२९७
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ३६ ५२११६ ० १३५३
३३ सिंधुदुर्ग १३ ५६९८९ २ १५०३
३४ रत्नागिरी २७ ८४१८३ १ २५३१
कोल्हापूर मंडळ एकूण २४० ५८७४०५ ५ १५५७२
३५ औरंगाबाद ७३ ६८३९२ ० १९३६
३६ औरंगाबाद मनपा ४२ १०७२६१ ० २३३३
३७ जालना १४ ६६१९७ ० १२२२
३८ हिंगोली २९ २२०५२ ३ ५१२
३९ परभणी १४ ३७६२८ ० ७९८
४० परभणी मनपा २ २०७३४ ० ४४७
औरंगाबाद मंडळ एकूण १७४ ३२२२६४ ३ ७२४८
४१ लातूर ६२ ७६२३९ ० १८२६
४२ लातूर मनपा १४ २८२८५ ० ६४९
४३ उस्मानाबाद ८२ ७४७४८ १ २०१७
४४ बीड २८ १०८८४१ ० २८६३
४५ नांदेड ३५ ५१७४७ ० १६५०
४६ नांदेड मनपा १४ ५०६०१ ० १०४१
लातूर मंडळ एकूण २३५ ३९०४६१ १ १००४६
४७ अकोला २३ २८१३५ २ ६६६
४८ अकोला मनपा २७ ३७७३७ १ ७९०
४९ अमरावती ५० ५५९५९ २ ९९९
५० अमरावती मनपा ७५ ४९४१४ ० ६१४
५१ यवतमाळ ५३ ८१७३९ १ १८१४
५२ बुलढाणा ४३१ ९००६१ ० ८१४
५३ वाशिम ६० ४५३१९ ० ६३७
अकोला मंडळ एकूण ७१९ ३८८३६४ ६ ६३३४
५४ नागपूर २०७ १४९९४८ १ ३०७७
५५ नागपूर मनपा २३१ ४२३८९९ ५ ६०६४
५६ वर्धा ५१ ६५३७२ ० १२३३
५७ भंडारा ७१ ६७६४४ ० ११२९
५८ गोंदिया ३० ४५२८७ ० ५७९
५९ चंद्रपूर ५२ ६५३४३ ० ११००
६० चंद्रपूर मनपा ११ ३३२०५ ० ४८४
६१ गडचिरोली १५९ ३६२२१ ० ६८६
नागपूर एकूण ८१२ ८८६९१९ ६ १४३५२
इतर राज्ये /देश ० १४४ ० १११
एकूण ५४५५ ७८३५०८८ ६३ १४३३५५
Exit mobile version