आरोग्य

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, पैसे नाही म्हणून शस्त्रक्रिया थांबणार नाही गंभीर आजारांवरील उपचारांसाठी निधी, हजारो रुग्णांनी घेतला 'महाआरोग्य शिबिरा'चा लाभ

आजार कितीही गंभीर आणि मोठा असला तरी केवळ पैसे नाही म्हणून गरिबांचे उपचार थांबू नये, यासाठी राज्य शासनाने विविध योजनांच्या माध्यमातून आवश्यक निधी उपलब्ध केला आहे. येथे आयोजित महाआरोग्य शिबिर हे गरीब रुग्णांसाठी एक वरदान असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, कर्करुग्ण उपचारासाठी महाकेअरच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या उपचार व संशोधन सुविधा महाकेअर अंतर्गत नागपूरमध्ये नागपूर हाय एनर्जी मेडिकल सायक्लोट्रॉन प्रोजेक्ट उपकंपनी स्थापन करणार

राज्यातील कर्करोग रुग्णांवर उपचारासाठी महाराष्ट्र कॅन्सर केअर, रिसर्च अँड एज्युकेशन फाऊंडेशन कंपनी (महाकेअर)च्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या उपचार व संशोधन सुविधा निर्माण कराव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र कॅन्सर केअर, रिसर्च अँड एज्युकेशन फाऊंडेशन कंपनी संचालक मंडळाची पहिली बैठक सह्याद्री अतिथीगृहात पार पडली. यावेळी वैद्यकीय शिक्षण …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, अ‍ॅक्युपंक्चर उपचार शिक्षणाच्या विस्तारासाठी राज्य शासन प्रयत्नशील मी स्वतः पाठदुखीने त्रस्त असताना या उपचार पद्धतीचा लाभ

अ‍ॅक्युपंक्चर उपचार पद्धतीतून असंख्य रूग्णांना आपल्या व्याधीपासून मुक्त होण्यास मदत झाली आहे. तेवीस-चोवीस वर्षांपूर्वी मी स्वतः पाठदुखीने त्रस्त असताना या उपचार पद्धतीने मला तंदुरुस्त होता आले. या ज्ञानशाखेच्या विस्तारासाठी व याचे शैक्षणिक मार्ग वृद्धींगत व्हावेत, या दृष्टीने राज्य शासन प्रयत्नशील असून शासकीय पातळीवर कोठेही कमतरता पडणार नाही, अशी निःसंदिग्ध ग्वाही …

Read More »

प्रकाश आबिटकर यांची माहिती, रुग्णालयांच्या शुल्क नियंत्रणासह कर्करोग उपचारांसाठी नवीन पॅकेजेस आरोग्य सेवांचे निकष सुधारणार

राज्यातील नागरिकांना अधिक दर्जेदार, सुलभ आणि परवडणाऱ्या आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य क्षेत्रात विविध धोरणात्मक सुधारणा करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली . विधानसभा सदस्य प्रशांत ठाकूर यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना मंत्री आबिटकर बोलत होते. सदस्य मनिषा चौधरी यांच्या सह …

Read More »

हसन मुश्रीफ यांची माहिती, नवीन व श्रेणीवर्धित बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालयांना मंजुरी बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालये सुरू करण्यासाठी केंद्र शासनाकडे प्रस्ताव सादर करणार

राज्यातील आरोग्य व्यवस्थेसाठी कुशल परिचारिकांची उपलब्धता वाढविणे तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना शासकीय महाविद्यालयांमधून कमी शैक्षणिक शुल्कात दर्जेदार नर्सिंग शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने नर्सिंग शिक्षणाच्या व्यापक विस्ताराचा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील निवेदन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभेत केले. मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, राज्य मंत्रिमंडळाच्या …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, शवविच्छेदन प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अहवालांतील विलंबही कमी होणार

राज्यातील शवविच्छेदन प्रक्रिया अधिक आधुनिक, पारदर्शक आणि कार्यक्षम करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असून, मुंबईत लवकरच नॉन-इन्वेसिव्ह पोस्टमॉर्टेम (शरीराला चिरफाड न करता शवविच्छेदन) तंत्रज्ञान सुरू करण्यात येणार आहे. राज्यातील शवविच्छेदन अहवाल वेळेत उपलब्ध व्हावेत यासाठी शासनाने व्यापक उपाययोजना हाती घेतल्या असून, गेल्या दोन ते तीन वर्षांत प्रलंबित अहवालांची संख्या …

Read More »

नरहरी झिरवाळ यांची माहिती, हाफकीन प्रयोगशाळेच्या आधुनिकीकरणासाठी निधी उपलब्ध करून देणार हाफकीन जीव-औषध निर्माण महामंडळाच्या त्रिगुणी लस निर्मिती

हाफकीन जीव-औषध निर्माण महामंडळाच्या त्रिगुणी लस निर्मिती प्रयोगशाळेच्या आधुनिकीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधान परिषदेत सांगितले. विधान परिषद सदस्य भाई जगताप यांनी हाफकीन महामंडळाच्या प्रयोगशाळेच्या आधुनिकीकरणासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना ते बोलत होते. …

Read More »

प्रकाश आबिटकर यांची माहिती, ईएसआय रुग्णालयांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानावर भर आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्यासाठी शासनाचे प्रयत्न

राज्यातील कामगार विमा रुग्णालयांमध्ये (ईएसआय) आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून आरोग्यसेवा सक्षम, जलद आणि सुलभ करण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील असल्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले. सदस्या मनीषा कायंदे यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला. तर सदस्य भाई जगताप, प्रसाद लाड, राजीव पोतदार यांनी उपप्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना …

Read More »

महात्मा फुले जनआरोग्य योजनेत फ्लाइंग स्क्वॉडची निर्मिती बेड उपलब्धतेसाठी रिअल-टाइम डॅशबोर्ड – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

महात्मा फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अनियमिततेवर तात्काळ कारवाई करणारे विशेष फ्लाइंग स्क्वॉड स्थापन करण्यात येणार असून, रुग्णांना कोणत्या रुग्णालयात बेड उपलब्ध आहेत याची माहिती मोबाईलवरच मिळावी यासाठी रिअल-टाइम बेड उपलब्धता डॅशबोर्ड विकसित करण्यात येत असल्याची माहिती आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत लक्षवेधी …

Read More »

राज्यातील सर्व नर्सिंग महाविद्यालयांसाठी प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) लागू करणार सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती

राज्यातील सर्व नर्सिंग महाविद्यालयांमध्ये शिस्त, नियमितता आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) लागू करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत दिली. गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयांतर्गत शासकीय परिचर्या प्रशिक्षण विद्यालयातील ४५ विद्यार्थिनींना विषबाधा झाल्याच्या घटनेसंदर्भात सदस्य प्रवीण दटके यांनी उपस्थित …

Read More »