मुंबई: प्रतिनिधी
राज्याचे मुख्यालय असलेल्या मंत्रालयातील उद्योग, ऊर्जा व कामगार विभागातील एक शिपाई आणि टंकलेखक लिपीक कोरोना बाधीत सापडल्याची बाब उघडकीस आली आहे. यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती या विभागातील विश्वसनीय सूत्रांनी दिली.
या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागात पहिल्यांदा शिपाई कोरोनाबाधीत असल्याचे ८ जुलै रोजी आढळून आले. त्यानंतर याच विभागातील लिपीक टंकलेखक असलेलाही कोरोनाबाधीत असल्याची माहिती पुढे आली. यापैकी एकाची प्रकृती खालावल्याने त्यास व्हेटीलेटरवर ठेवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
मंत्रालयात सापडले आणखी २ बाधित रूग्ण
