Marathi e-Batmya

विमान प्रवास केलेले ओमायक्रॉन ४ बाधित विमानतळावर, तर पुणे-पिंपरीत प्रत्येकी १

मराठी ई-बातम्या टीम

विमानाने प्रवास करून मुंबईत पोहोचलेल्या एकूण प्रवाशांपैकी ४ प्रवाशी ओमायक्रॉन बाधित असल्याचे आढळून आले असून पुणे मध्ये १ तर पिंपरी-चिंचवड येथे १ असे मिळून ६ एकूण ओमायक्रॉन बाधित रूग्ण महाराष्ट्रात आढळून आले. मुंबईत आढळून आलेल्या रूग्णापैकी २ जण इंग्लडहून तर २ जण टांझानिया येथून मुंबईत आलेले आहेत. यापैकी एक जण मुंबईतील रहिवासी आहे. तर एक जण औरंगाबाद आणि दोघे कर्नाटकातील असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने या चार जणांचे अहवाल आज दिले तर पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथील दोघांचाही अहवाल आजच देण्यात आला. त्यावेळी ही माहिती उघडीस आली. आजपर्यंत राज्यात एकूण ५४ ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत.

यापैकी २८ रुग्णांना त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आज ओमायक्रॉन बाधित आढळलेल्या ६ रुग्णांची सर्वसाधारण माहिती –

-मुंबईचे ४ रुग्ण

-मुंबईतील चारही रुग्ण हे विमानतळावरील सर्वेक्षणातून शोधण्यात आले आहेत. यातील एक रुग्ण मुंबईतील आहे .

– २  रुग्ण कर्नाटक राज्यातील तर १ रुग्ण औरंगाबाद येथील रहिवासी आहे. यातील २ जणांनी टांझानियाचा तर २ जणांनी इंग्लंडचा प्रवास केलेला आहे. हे चारही जण पूर्ण लसीकरण झालेले आणि लक्षणविरहित आहेत. सर्वजण सध्या मुंबईतील सेव्हन हिल रुग्णालयात विलगीकरणात आहेत.  हे रुग्ण २१ ते ५७ वर्षे या वयोगटातील असून यात २ स्त्रिया तर २ पुरुष आहेत.

आज पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या संपर्कातील एका ५ वर्षीय मुलामध्ये ओमायक्रॉन विषाणूचे निदान झाले आहे. या रुग्णास कोणतीही लक्षणे नाहीत. पिंपरी चिंचवड मनपा क्षेत्रातील मध्यपूर्वेत प्रवास करुन आलेल्या ४६ वर्षीय पुरुषांमध्ये ओमायक्रॉन विषाणू आढळला आहे. या रुग्णाची लक्षणे सौम्य असून तो सध्या एका खाजगी रुग्णालयात भरती आहे. त्याचे लसीकरण पूर्ण झालेले आहे.

 

अ.क्र. जिल्हा /मनपा आढळलेले एकूण ओमायक्रॉन रुग्ण
मुंबई २२*
पिंपरी चिंचवड ११
पुणे ग्रामीण
पुणे मनपा
सातारा
कल्याण डोंबिवली
उस्मानाबाद
बुलढाणा
नागपूर
१० लातूर
११ वसई विरार
  एकूण ५४
*यातील २ रुग्ण कर्नाटक तर प्रत्येकी १ रुग्ण छत्तीसगड, केरळ, जळगाव आणि औरंगाबाद येथील आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्वेक्षणात हे रुग्ण आढळले आहेत.

 

Exit mobile version