Marathi e-Batmya

१० वी च्या परिक्षा निकालाची तारीख जाहिर

काही दिवसांपूर्वी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी २० मे रोजी १२ परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत परिक्षेत अयशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांना वावगं पाऊल न उचलम्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर राज्यातील दहावी परिक्षेचा निकाल ७ दिवसानंतर लागणार असल्याचे संकेत दिले होते. त्यानुसार १० वी परिक्षेचा निकाल आता २७ मे रोजी लागणार असल्याचे संकेत दिले होते. त्यानुसार राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी आज १० वी परिक्षेचा निकाल २७ मे रोजी जाहिर होणार असल्याची घोषणा केली.

१० वीच्या परिक्षेला राज्यातून १६ लाखाहून अधिक विद्यार्थी परिक्षेला बसले होते. या विद्यार्थ्यांना २७ तारखेला १० वीचा निकाल दुपारी १ वाजल्यापासून ऑनलाईन जाहिर होणार असून विद्यार्थ्यांना या खालील संकेतस्थळावर पाहता येणार आहे.

https://mahresult.nic.in

http://sscresult.mkcl.org

https://sscresult.mahahsscboard.in

https://results.digilocker.gov.in

https://results.targetpublications.org

१० वीच्या विद्यार्थ्यांना स्वतःला मिळालेले गुण तर पाहता येणारच आहेत. त्याशिवाय डिजी लॉकरच्या सुविधेमुळे गुणपत्रिकाही संग्रहीत करता येणार आहे. याशिवाय मिळालेल्या गुणांबाबत काही शंका असल्यास गुणपडताळणी करण्यासाठी २८ ते ११ जून या कालावधीत ऑनलाईन शुल्क भरून त्यासाठी अर्ज भरता येणार आहे.
१० वीची परिक्षा मार्च २०२४ मध्ये घेण्यात आली होती. त्याचा निकाल २७ मे रोजी जाहिर होणार आहे. सर्व उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना श्रेणी सुधारच्या संधी उपलब्ध राहणार असून जुलै-ऑगस्ट २०२४ आणि मार्च २०२५ अशा दोन संधी उबलब्ध राहणार आहेत. तर श्रेणी सुधार आणि पुरवणी परिक्षेसाठी ३१ ऑगस्टपासून आणि ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहे. हे अर्ज पुणे बोर्डाच्या संकेतस्थळावरून ऑनलाई पध्दतीने अर्ज भरता येणार आहेत.

Exit mobile version