Breaking News

वाजतगाजत गणपतीला निरोपः भक्तांकडून पुढच्यावर्षीचे आमंत्रण देत विसर्जन दुपारपासून मंडळाच्या कार्यकर्त्यांची आणि गणेशभक्तांचा जल्लोष

मागील १० दिवसांपासून हिंदू धर्मियांसाठी श्रद्धेचा विषय असलेल्या गणपती-गौरीला पूजत गणेशोत्सव साजरा केला. या १० दिवसांच्या कालावधीत अनेक वाईट गोष्टीपासून दुर राहण्याचा संकल्प करत अनेकांनी मनोभावे पूजा करत गणपती आणि गौरीचा आज सन्मानपूर्वक निरोप दिला. तर अनेक गणेश भक्तांनी आणि गणपती मंडळांनी गणपतीला पुढच्यावर्षीचे आमंत्रण देत विधिवत समुद्राच्या पाण्यात, कृत्रिम तलावात किंवा नैसर्गिक तलावात आणि नदीत विसर्जन केले.

साधारणतः दुपारपासून राज्यातील गणेशाच्या विसर्जन मिरवणूकीला विविध मंडळांनी सुरुवात केली. उत्साही कार्यकर्त्यांनीही ढोल-ताशे आणि डिजेच्या तालावर नाचत विसर्जन मिरवणूकीत सहभाग नोंदविला. पुण्यामधेय लोकमान्य टिळकांनी सुरु केलेल्या गणपती, दगडूशेडचा गणपतीया सह पाच मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिळवणूकींने सुरुवात झाली. तर मुंबईत पश्चिम उपनगरात, पूर्व उनगरातही आणि दक्षिण मुंबईतील लालबागचा राजा, चिंतामणी, यासह मोठे गणेशोत्सव साजरे करणारे आणि मानाच्या गणपती मंडळानी आज दुपारीच गणपती विसर्जन मिरवणूकीला सुरुवात केली.

संध्याकाळ पर्यंत या मंडळांनी त्यांच्या गणपती विसर्जनाच्या निश्चित ठिकाणी पोहोचले नाहीत. रस्त्यातच इतर मंडळांचे गणपती आणि कार्यकर्त्यांचा उत्साह या मिरवणूकीत ओसंडून वहात असल्याने या गणपती मंडळाना एका ठिकाणाहून पुढच्या टप्प्यात पुढे सरकाकायला दोन-तीन तास लागत होते.

संध्याकाळ झाल्यानंतर अनेक गणपती मंडळांनी पोलिसांनी बंदी घातलेली असतानाही लेझर शो-कर्कश डीजेच्या आवाजाचा वापर करण्यास सुरुवात केली. या कर्णकर्कश डीजेच्या तालावर नाचत नाचत विसर्जन मिरवणूक सुरु ठेवली. काही ठिकाणी पोलिसांनी काही मंडळाना बंदी घातलेले लेझर शो आणि कर्ण कर्कश डीजे वापरण्यास मनाई केली. तरी मंडळांकडून डीजे आणि लेझर शोचा वापर तसाच सुरु ठेवला.

दरम्यान शिवसेना उबाठा गटाचे नेते अंबादास दानवे आणि इतर काही जणांनी विसर्जन मिरवणूकीत सहभागी होत नाचण्याचा आनंदही लुटला. आता यातील अनेक मंडळाच्या मिरवणूका उद्या दिवसभरात किंवा संध्याकाळपर्यंत चालणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत