Breaking News

अजित पवार यांचे आवाहन, इर्शाळवाडीची दुर्घटना झाल्याने वाढदिवस साजरा करू नका मात्र ट्विटरवरून ताज हॉटेल येथे वाढदिवसाचा कार्यक्रम साजरा कऱण्याचे निमंत्रण

गतवर्षीच्या रायगड जिल्ह्यातील माळीण घटनेची आठवण करून देणारी दुसरी घटना इर्शाळवाडी येथे आदिवासी समाजाची वस्ती असलेल्या ठाकरवाडी येथे दरड कोसळून झालेल्या मोठ्या दुर्घटनेत १२ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती असून या दरड खाली अनेक घरे दबली गेली आहेत. त्यामुळे जीवातहानीबरोबरच मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाल्याचे सांगण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी घोषणा केली.

यावेळी अजित पवार म्हणाले, रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीच्या येथे घरांवर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले असून यावर्षी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २२ जुलै रोजी वाढदिवस असून राज्यभरातील त्यांचे चाहते, कार्यकर्ते, हितचिंतक दरवर्षी मोठ्या प्रमाणावर हा वाढदिवस साजरा करतात. इर्शालवाडी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर कुणीही आपला वाढदिवस साजरा करू नये. पुष्पगुच्छ, होर्डींग, जाहिरातींवर खर्च न करता तो निधी इर्शालवाडी गावाच्या पूर्नउभारणी आणि ग्रामस्थांच्या मदतीसाठी उपयोगात आणावा, असं आवाहन केले.

तसेच पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, दरड जिथे कोसळली तो भाग दरडप्रवण क्षेत्रात नव्हता. ही घटना समजल्यानंतर, साडेसात पर्यंत नियंत्रण कक्षात बसून होतो. एकंदरीतच पाच लोक अद्यापपर्यंत दगावली आहे. जखमींना पनवेल, एमजीएम हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी हलवण्यात आलं आहे. हेलिकॉप्टरने छोटं मशिन पाठवायचं असेल तर ते एक टन पर्यंतच वजन उचलू शकत. तसंच, हवामान खराब असल्याने टेक ऑफ करता येत नाही, अशी माहिती सकाळी प्रसिद्धी माध्यमांना दिली.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, राज्याचे प्रमुख घटनास्थळी दाखल झाल्याने सगळी यंत्रणा कामाला लागली आहे. मातीची ढिगारे उचलण्यासाठी आता माणसांशिवाय पर्याय नाही. मदत कार्यासाठी तिथे ५०० – ७०० माणसे पोहोचली आहेत. अजून काही माणसं पाठवली आहेत. ठराविक काळात हे काम करावं लागणार आहे. आम्ही सगळे लक्ष ठेवून आहोत, असंही सांगितले.

मागील वर्षी रायगड जिल्ह्यातील माळीण येथे झालेल्या घटनेच्या ही घटना आहे का असा प्रश्न प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारताच अजित पवार म्हणाले, माळीण जी घटना घडली. त्यानंतर आपण भारतीय भूवैज्ञानिक समिक्षण विभागाचा अहवाल मागवला. की आमच्या राज्याची परिस्थिती काय आहे. यामध्ये संभाव्य दरड प्रवण क्षेत्राची यादी करायला सांगितली आहे. त्यामुळे हा भाग दाखवलेला नाही. याआधी येथे दरड कोसळलेली नव्हती. येथे भूस्खलन होण्याच्या घटना निदर्शनास आलेल्या नाहीत. पण १७, १८, १९ जुलै या तीन दिवसांत पाऊस पडला, अशी माहितीही दिली. इर्शाळवाडी येथे २२८ लोक तिथे राहत होती. ४८ कुटुंब होती, अशी माहितीही दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत