सोमनाथ सूर्यवंशी, विजय वाकोडे तसेच सरपंच संतोष देशमुख यांच्या मृत्यू प्रकरणाचे आता राज्यभर पडसाद उमटत आहेत . परभणीतून यासंदर्भांत निघालेला लॉन्ग मार्च लवकरच मुंबईत धडकणार असून सदर मोर्चाची मुंबईत देखील ठिकठिकाणी जोरदार तयारी सुरु आहे मुंबईतील आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला असलेल्या वरळीमध्ये उद्या मंगळवारी २२ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले असून मुंबईकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे .
परभणीत संविधानाची विटंबना झाल्यानंतर त्याचे पडसाद उमटल्यानंतर पोलिसांनी केलेल्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये अनेक तरुणांवर केसेस टाकण्यात आल्या सदर घटनेचे चित्रीकरण करणारा युवक सोमनाथ सूर्यवंशी त्यालादेखील अटक करून पोलिसांनी जेलमध्ये टाकले होते यावेळी झालेल्या मारहाणीत सोमनाथ याचा मृत्यू झाला होता तसेच जेष्ठ रिपब्लिकन नेते विजय वाकोडे हे प्रकरण शांततेने हाताळत असताना त्यांचाही हृदयविकाराने मृत्यू झाला होता . सदर मृत्यूप्रकरणी सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांसह विविध पक्ष संघटनांनी परभणी ते मुंबई असा लॉन्ग मार्च आयोजित केला आहे , या मार्च मध्ये ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे . लवकरच हा मार्च मुंबईत मंत्रालयावर धडकणार असून मुंबईतदेखील सर्व वस्त्यांमध्ये या मोर्चातील सहभागासाठी बैठक घेतल्या जात आहेत .
मंगळवारी २१ जानेवारी रोजी मुंबईतील आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला असलेल्या वरळी नका पालिका चाळ येथील पंचशील नगर सभागृहात सायंकाळी ७ वाजता सर्वपक्षीय संघटनांची बैठक आयोजित करण्यात आली आहे . मुंबईत येत असलेल्या लॉन्ग मार्च मध्ये नागरिकांचा सहभाग मोर्चेकऱ्यांनी राहण्याची जेवणाची व्यवस्था तसेच इतर आवश्यक बाबींवर या बैठकीत चर्चा केली जाणार आहे मुंबईकरांनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन या बैठकीचे आयोजक जितेंद्र निकाळजे , रमेश लोखंडे,मनोज मर्चंडे ,शांतू डोळस,अनन्ब्द खरात,राकेश कांबळे अमोल निकाळजे,राम तंगारे ,किरण माने आदीनी केले आहे . वरळीतील बैठकीनंतर घाटकोपर रमाबाई कॉलनी , विक्रोळी तसेच आंबेडकरी वस्त्यांमध्ये या बैठक होणार असल्याचे निकाळजे यांनी सांगितले
