मुंबईत पहाटेपासून सकाळी ७ वाजेपर्यंत जवळपास ३०० मिलीपेक्षा जास्तीचा पाऊस पडल्याने मुंबई आणि उपनगरीय वाहतूकीच्या स्थानकात रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले. त्यामुळे कल्याण स्थानकाच्या पुढे रेल्वे वाहतूक होत नव्हती. तसेच ठाणे ते सीएसएमटी दरम्यान सुरु असलेली रेल्वे सेवाही अत्यंत धीम्या पध्दतीने विस्कळीत पध्दतीने सुरु होती. मात्र पावसाने काहीशी उघडीप दिल्याने दुपारनंतर रेल्वे ट्रॅकवर साचलेले पाणी ओसरायला सुरुवात झाली. त्यामुळे दुपारी २ नंतर हळू हळू मध्य, हार्बर, रेल्वेच्या लोकलसेवा सुरळीत सुरु झाली.
सुरुवातीला लोकल सेवा कल्याणपर्यंत सुरु करण्यात आली. त्यानंतर पुन्हा ४.३० वाजल्यापासून कल्याणच्या पुढे कसारा, कर्जत, खोपोली दरम्यानची वाहतूक सेवा सुरु करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेने एक्स वर ट्विट करत दिली.
दरम्यान कल्याणच्या पुढे धावणारी पहिली ट्रेन ४. ३० सीएसटीएमवरून कर्जत, कसारा, खोपोलीसाठी धावणार आहे. त्यामुळे लांब पल्ल्याच्या रेल्वे सेवाही सुरुळीत होणार असल्याची आशा प्रवाशांमध्ये निर्माण झाली आहे. तसेच हार्बर मार्गावरील पनवेल पर्यंतची, ठाणे पनवेल, खोपरखैरणे दरम्यानची वाहतूकही सुरळीत झाल्याचे सांगत या मार्गावरील लोकलसेवाही दुपारपर्यंत ठप्प ठेवण्यात आली होती.
याशिवाय दुपारी १.४२ वाजता उच्च लाटेचा इशारा आणि दुपारनंतर मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला होता. मात्र मुंबईतील काही भागात पावसाने पुन्हा एकदा पडायला सुरुवात झाली तर काही भागात तुरळक प्रमाणात पाऊस पडला. त्यामुळे मुंबईच्या रस्ते आणि रेल्वे ट्रॅकवरील पाणी ओसरण्यास चांगलीच मदत झाली.
#CR Monsoon Updates at 16:30 hrs on 08.07.2024.#CRUpdates pic.twitter.com/kuxloke3WF
— Central Railway (@Central_Railway) July 8, 2024
