Marathi e-Batmya

आता आठवड्यातील फक्त दोनच दिवस भाजीपाल्याची दुकाने

मुंबई: प्रतिनिधी

दिवसेंदिवस मुंबईतील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत आहे. तसेच नागरिकांना गरज असेल तरच बाहेर पडा अशी विनंती करूनही अनेकजण भाजीपाला-फळे खरेदीच्या निमित्ताने घराबाहेरच राहुन गर्दी करत आहेत. त्यामुळे या वाढणाऱ्या गर्दीला आटोक्यात आणण्याच्या अनुषंगाने इथून पुढे आढवड्यातील दोनच दिवस भाजीपाला-फळभाजा खरेदीसाठी दुकाने सुरु ठेवण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने जारी केला आहे. महापालिकेने घाटकोपर, पार्कसाईट, पंतनगर, टिळक नगर या परिसरात हा आदेश लागू केला आहे.

आठवड्यातील दोन दिवस म्हणजे सोमवार आणि गुरूवारी भाजीपाला आणि फळभाज्याची दुकाने सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेर्यत सुरु ठेवण्यात येणार आहेत. या दोन दिवसां व्यक्तीरिक्त मंगळवार, बुधवार, शुक्रवार आणि रविवारी दुकाने सुरु ठेवल्यास दुकानदारांवर कारवाई आपतकालीन कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचे महापालिकेच्यावतीने जाहीर करण्यात आले आहे.

Exit mobile version