Marathi e-Batmya

दिव्यांग मतदारांसाठी विनामूल्य वाहन व्यवस्था

मुंबई उपनगर जिल्ह्यात २० मे रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. या दिवशी जिल्ह्यातील दिव्यांग मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी प्रत्येक मतदारसंघनिहाय मोफत प्रवासासाठी समन्वय अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील जास्तीत जास्त दिव्यांग मतदारांनी या सेवेचा लाभ घेवून मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी केले आहे.

भारत निवडणूक आयोगाने दिव्यांग मतदार तसेच ८५ वयापेक्षा जास्त वय असणाऱ्या मतदारांच्या सोयीसुविधांबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित केलेल्या आहेत. यामध्ये दिव्यांग तसेच ८५ वयावरील असलेले ज्येष्ठ नागरिक यांना मतदान केंद्रावर सोयीसुविधा पुरविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ही बाब विचारात घेवून जिल्हा निवडणूक यंत्रणेमार्फत काटेकोरपणे नियोजन करण्यात आले असून दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांसाठी विशेष सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या मतदारांना आपल्या मतदान केंद्रापर्यंत पोहचविण्यासाठी मतदारसंघानिहाय दिव्यांग मतदार समन्वय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

समन्वयक अधिकाऱ्यांचे नावे व मोबाईल क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत :
१५२ बोरीवली- कृतिका गंधारे- ९८३३४४०४२३,
१५३ दहिसर- वंदना हरीनामे- ९८२०११८४५७
१५४ मागठाणे- दिलिप दुर्गे-८७७५७२२४६० / स्मिता परमार- ९८२०४५७३२७
१५५ मुलुंड- राजाराम शेळके-९६५३१५८०७८ / कैलास जाधव- ९५६१४५८७९४
१५६ विक्रोळी- सुनिल पावळे-७२७६००९१४७ / सुप्रिया मोरे- ९८९२६६९५३०
१५७ भांडुप- निखिल मराठे- ८८८८८२४९५० / नम्रता कुलकर्णी – ७७३८३७६५७३
१५८ जोगेश्वरी- नुतन वंजारा- ९१६७१६६४१२ / स्मिता परब- ९८१९३६८८२७
१५९ दिंडोशी- प्रमोद पाटील-९८६९७२८१०० / योगेंद्र वसंत भांड-८०८७५००८९७
१६० कांदिवली- राजेंद्र माळवे-९९७०२३४९०९ / बिपीन वडे – ९०४९३६५०१८
१६१ चारकोप- रेखा गांगुडे – ९८२०९११२९०
१६२ मालाड- अर्चना लाळगे- ९९६९७९५०७८
१६३ गोरेगाव- मंजू वैश्य-८३६९३०६८६० / साक्षी लाड- ९८३३३१७२१२
१६४ वसोवा- बालाजी कांबळे- ९९६०२८३१३१ / राजेश्री सदावर्ते- ७०५८७०६७८७
१६५ अंधेरी प- सचिन कटके- ८६२३९५२२८६ / अर्चना जाधव- ९९३०९९०७८९
१६६ अंधेरी पूर्व- सुनिता चव्हाण- ७९७७७६३४८७
१६७ विलेपार्ले- गोविंद पेडेकर- ९३२१९८२८०६
१६८ चांदिवली- बालाजी जानते-९८६९५६१७५६, 9702953815/ उज्वला चव्हाण- ९९६९३५०७६७
१६९ घाटकोपर (पश्चिम)- माधवी सावरकर- ८८५००७६६८२ / अश्विनी पळशीकर- ९८१९९३७८३७
१७० घाटकोपर (पूर्व)- प्रफुल्ला पुरबिया-९९१९७४८४५५ / संजीवनी पाटील- ७२०८०१८०४६
१७१ मानखुर्द- बाळू खोमणे- ९८९००००९०५ / सुरेश चव्हाण- ९२२१७७६९६१
१७२ अणुशक्ती- रेखा भोजने- ९८२०५८९७६१ / सुनिल आडे- ९८३३०२४९७६
१७३ चेंबुर- रश्मी तावडे- ९६१९८९७८९८ / सुनिता चिंदरकर- ९८२१४३४४६८
१७४ कुर्ला- संजू सोनावणे- ८९७६२३१९९० / प्रशांत गर्गे – ९५२७०७६५६३
१७५ कलिना- सोमनाथ मठपती- ९८७२६५९६१९, ८०८७१०२९३२ / दौलतसिंग चव्हाण- ९८६ ०८७१५४६
१७६ बांद्रा (पूर्व)- सुभाष गढरी- ९८६९९४४४०५ / निलेश वांळूज- ९८९०३४२७६०
१७७ बांद्रा (पश्चिम)- अनिता ताटे- ९९६९००६७२४/ मिलिंद पांजरी- ८८०५७६८९२४

 

Exit mobile version