Marathi e-Batmya

उल्हासनगरच्या महिलेकडून मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न

मुंबईः प्रतिनिधी
शासकिय कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी सध्या शिक्षा भोगत असलेल्या पतीच्या सोडवणूकीसाठी उल्हासनगर येथील एका महिलेने मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र मंत्रालयात लावलेल्या संरक्षण जाळीमुळे सदर महिला बचावली.
उल्हासनगर येथील रहिवाशी असलेली प्रियंका अजय गुप्ता असे या महिलेचे नाव असून तीच्या पतीवर आयपीसी ३५३ अन्वये गुन्हा दाखल असून तो सध्या तुरूंगात आहे. पतीला तुरूंगातून सोडविण्यासाठी सदर महिलेने हे कृत्य केल्याची माहिती मंत्रालयातील पोलिसांनी दिली.
सदर महिलेला मंत्रालयात तैनात असलेल्या पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील उपचारासाठी तीला सीएसएमटी येथील सेंट जॉर्ज हॉस्पीटल येथे नेले.

Exit mobile version