Marathi e-Batmya

अखेर मंत्रालयातील त्या तरूणाचा मृत्यू

मुंबई: प्रतिनिधी

न्यायासाठी मंत्रालयात आलेल्या हर्षल रावते या तरूणाने पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र तातडीने पोलिसांनी त्याला सीएसटी जवळील सेंट जॉर्ज रूग्णालयात नेले असता त्याचा आधीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.

दरम्यान सदर हर्षल रावते हा एका खूनाच्या गुन्ह्यातील आरोपी असून तो पँरोलवर सुटून आलेला होता. मात्र त्याला कोणी तरी त्रास देत असल्याने त्याच्या विरोधात तक्रार करण्यासाठी तो संध्याकाळी मंत्रालयात आल्याचे पोलिसांकडून अनौपचारीकरित्या सांगण्यात येत आहेत. हर्षल रावते यांच्या वडीलाशीही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी बोलल्याचे समजते.

 

Exit mobile version