Marathi e-Batmya

नालेसफाईची माहिती प्रसिध्द करण्याबरोबरच गाळ टाकण्याचे चित्रिकरण करा

मुंबई : प्रतिनिधी

मुंबईतील नालेसफाईबाबत महापालिका, रेल्‍वे प्रशासनासोबत‍ दोन वेळा बैठक घेत्‍यानंतर तसेच प्रत्‍यक्ष कामाची पाहणी करून मुंबईतील भाजप नगरसेवकांनी केलेल्‍या पाहणीचा आढावा घेतल्‍यानंतर आज पत्रकारांशी बोलताना महापालिकेच्‍या स्‍थायी समितीने नालेसफाईच्‍या कामांबाबत सावधानता बाळगावी, दर आठवड्याला नाले सफाईची माहीती प्रसिध्द करण्याबरोबरच डंपींग ग्राऊंडवर गाळ टाकण्याचे सीसीटीव्हीद्वारे चित्रिकरण करण्याची सूचना भाजप मुंबई अध्यक्ष अँड. आशिष शेलार यांनी केल्या.

मु्बईतील नालेसफाईच्‍या कामांचा आढावा घेण्‍यासाठी मुंबई भाजपा अध्‍यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांच्‍या पुढाकाराने २२ मार्च २०१८ ला पहिली उच्चस्‍थरीय आढावा बैठक घेण्‍यात आली. या बैठकीत मुंबईतील रेल्‍वे हद्दीतून क्रॉस जाणा-या ४३ नाल्‍यांच्‍या कामांचा आढावा घेण्‍यात आला. तसेच अपुर्ण्‍ कामांची संयुक्‍त पाहणी करण्‍याचेही निश्चित करण्‍यात आले. त्‍यानंतर १८ एप्रिला २०१८ ला पुन्‍हा पाठपुरवा करणारी बैठक आमदार अॅड आशिष शेलार यांनी घेतली. तर आज शुक्रवारी सकाळी नॉर्थ ए‍व्‍ह्युन्यू, मेन एव्ह्युन्‍यू साऊथ इव्‍ह्युनी, एसएनडीटी नाला, आर. के. मिशन नाला सह खार, सांताक्रुझ, वांद्र व गझदर बांध परिसरातील या नाल्‍यांची पाहणी त्‍यांनी केली. खार येथील भारत नगर सोसायटीमधील पुरपरिस्थितीची बैठक घेतली तर भाजपाचे नगरसेवकही नालेसफाईच्‍या कामावर लक्ष ठेऊन असून भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी विणा नगर, जे. जे. अॅकडमी, या मुलुंड, भांडून परिसरातील कामाची पाहणी केली, वडाळा विभागातील नगरसेविका नेहल शहा यांनी बंगालीपूरा नाल्‍याची पाहणी केली. फ्रान्‍सीस नगर, बांद्रेकर वाडी या जोगेश्‍वरीतील नाल्‍यांची पाहणी नगरसेवक पंकज यादव यांनी केली. तर नगरसेवक जितेंद्र पटेल यांनी चंदावकर नाला याची पाहणी केली अशा प्रकारे भाजपाचेच नगरसेवक प्रत्‍यक्ष नाल्‍यावर उतनरून या कामावर पारदर्शक पहारेकर म्‍हणून लक्ष ठेऊन आहेत असेही त्‍यांनी सांगितले.

याबाबत बोलताना ते म्‍हणाले की, स्‍थायी समितीला आणि प्रशासनाला सावधानतेचा इशारा देत आहोत. दुर्लक्ष होऊन चालणार नाही, स्‍थायी समितीमध्‍ये आमचे सदस्य बोलत आहेत. त्‍यामुळे हा सावधानतेचा इशारा गर्भित आहेत. गझदर बांध पंपिंग स्‍टेशन सुरू झालेले नाही. त्‍यामुळे जूहू, सांतांक्रुझ, अंधेरी खार या परिसरातील पाण्‍याचा निचरा कसा होणार यातील स्‍पष्‍टता आलेली नाही. त्‍यामुळे हे पंपिंग स्‍टेशन तातडीने सुरू करा. जो कंत्राटदार काम करीत नाही त्‍याला तातडीने काळया यादीत टाकुन नवीन कंत्राटदार नियुक्‍त करावा अशी मागणी आम्‍ही करीत आहोत. या प्रक्रियेला दिरंगाई होणार असेल तर त्‍या ठिकाणी मातीचे बंधारे उभारण्‍यात आले आहेत ते काढून पाण्‍याचा निचरा झपाटयाने होईल याकडे लक्ष देण्‍यात यावे. तसेच वजन काटा याबाबतचा प्रश्‍न त्‍यावेळेला आम्‍ही उपस्थित केला होता आजही उपस्थित करीत आहोत. आजही वजन काटयाबाबत पारदर्शकता दिसून येत नाही. ती मुंबईकर जनतेसमोर आणा. नालेसफाईच्‍या कामाची माहिती आठवडयाला प्रसिध्‍द करा. जो कंत्राटदार काम करतो आहे त्‍या कंत्राटदाराचे नाव आणि त्‍याचा नंबर त्‍या त्‍या ठिकाणी नाल्‍यावर प्रदर्शित करण्‍यात यावे, ज्‍या डंम्पिंग ग्राऊडवर गाळ टाकला जात आहे त्‍याचे सीसीटीव्‍हीमध्‍ये चित्रिकरण करा, अशा सूचना करीत आमदार अॅड आशिष शेलार यांनी या सावधानतेच्‍या इशा-याचे महापालिकेने गांभिर्य लक्षात घ्‍यावे असे आवाहनही केले. यावेळी त्‍यांच्‍यासोबत भाजपा गटनेते मनोज कोटकही उपस्थित होते.

Exit mobile version