Marathi e-Batmya

आणि पावसाने मुंबई-उपनगर झाले धिमी

मुंबईः प्रतिनिधी
मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस सुरु असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबईसह ठाणे, भिवंडी, कल्याण, नवी मुंबई, वसई, दादर आणि पालघर या भागात पावसाचा जोर कायम राहिल्याने सायन, हिंदमाता, किंग्ज सर्कल, कुर्ला येथील सखल भागांत पाणी साचलं आहे. रस्त्यांबरोबर अनेक रेल्वे ट्रँकवरही पाणी साचल्याने रेल्वेसहित रस्त्यावरील वाहतूकही धीमी झाल्याचे चित्र पाह्यला मिळाले.
वेस्टर्न आणि इस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक संथगतीने सुरू आहे. तर पश्चिम आणि मध्य रेल्वेसहित हार्बर मार्गावरील वाहतूक दुपारी बंद करण्यात आली. कालांतराने ती पुन्हा सुरु करण्यात आली मात्र ती उशिराने सुरु आहे. दरम्यान मुसळधार पावासामुळे ठाणे, मुंबई आणि कोकणातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली.
राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण असल्याने येत्या ८ सप्टेंबरपर्यंत राज्यातील बहुतांश भागात पाऊस सक्रिय राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. येत्या ४८ तासांत मुंबईत मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला. मुंबईकरांनी समुद्रकिनारी जाऊ नये असा इशाराही हवामान खात्याने दिला.

Exit mobile version