Marathi e-Batmya

एनईईटी परीक्षेच्या पार्श्वभूमीवर ४ मे रोजी मेगा ब्लॉक नाही

राष्ट्रीय परिक्षा एजन्सी, नवी दिल्ली यांच्यामार्फत रविवार ४ मे २०२५ रोजी एनईईटी National Eligibility cum Entrance Test (UG) – 2025 ही परीक्षा आयोजित करण्यात आलेली आहे. या परीक्षेसाठी मोठ्या संख्येने उमेदवार मुंबईच्या बाहेरील भागातील आहेत आणि त्यांना त्यांच्या परीक्षा केंद्रावर विनाअडथळा पोहचण्यासाठी जिल्हा प्रशासन, मुंबई शहर यांनी रेल्वे प्रशासनास रविवार ४ मे २००५ रोजी कोणताही मेगा ब्लॉक Mega Block ठेऊ नये असे कळविले होते.

त्यानुषंगाने, रेल्वे प्रशासनाने ४ मे २०२५ रोजी सेंट्रल, हार्बर व वेस्टर्न रेल्वे या तीन मार्गांवर कोणताही मेगा ब्लॉक Mega Block नसल्याचे कळविलेले आहे. तरी याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी. तसेच,४-५-२०२५रोजी घेण्यात येणाऱ्या एनईईटी NEET ( UG) 2025 या परीक्षेकरिता बसलेल्या विद्यार्थ्यांनी https://cr.indianrailways.gov.in/ या लिंकवरून रेल्वेचे वेळापत्रक पाहावे, असे निवासी उपजिल्हाधिकारी मुंबई शहर यांनी कळविले आहे.

एनईईटी NEET ( UG) 2025 या परीक्षेकरिता बसलेल्या विद्यार्थ्यांनी https://cr.indianrailways.gov.in/ या लिंकवरून रेल्वेचे वेळापत्रक पाहण्याचे आवाहन केले.

Exit mobile version