Marathi e-Batmya

सरकारी वकील अॅड. घरत म्हणाले, राणा दाम्पत्य बाहेर आले तर परिस्थिती बिघडेल

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी हनुमान चालिसावरून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना आव्हान देत त्यांच्या घरासमोर जाऊन म्हणण्याचा हट्ट धरल्याने पोलिसांनी राणा दांम्पत्यांवर राजद्रोहासह दोन गटात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. जवळपास मागील आठवड्याभरापासून राणा दांमत्य पोलिस कोठडीत आहेत. सदरप्रकरणी जामीन मिळावा यासाठी त्यांनी केलेल्या अर्जावर आज दोन्ही बाजूंनी युक्तीवाद करण्यात आला. परंतु त्यावरील निर्णय सोमवारी देणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. त्यामुळे सोमवारपर्यत राणा दांम्पत्य कोठडीच राहणार आहे.

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण झाली आहे. मात्र, न्यायालयाने या अर्जावरील निकाल राखून ठेवला. सोमवारी २ एप्रिल रोजी त्यांच्या जामीन अर्जावर न्यायालय निकाल देणार आहे. न्यायालयातील सुनावणीची माहिती देताना सरकारी वकील प्रदीप घरत म्हणाले, आज कोर्टात दोन्ही बाजूंनी युक्तिवाद झाला. राणा दाम्पत्याच्या वकिलाने जामीन का द्यावा यासाठी युक्तिवाद केला. सरकारच्यावतीने राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जाला जोरदार विरोध करण्यात आला असून

राणा दाम्पत्याचं प्रकरण जामीन देण्यास कसं योग्य नाही याबाबत सरकारी पक्षाने युक्तिवाद केला. राणा दाम्पत्य तुरुंगाबाहेर आलं तर परिस्थिती बिघडू शकते असे आम्ही न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्याचे स्पष्ट केले.

नवनीत राणा आणि रवी राणा यांना प्रक्षोभक विधाने करून कायदा व सुव्यवस्था बिघडवल्याच्या आरोपाखाली अटक झालीय. दोघांविरोधात पोलिसांनी राजद्रोह, राज्य सरकारविरोधात प्रक्षोभक विधाने करणे आणि सरकारला आव्हान देणे आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. राणा दाम्पत्याविरुद्ध भादंवि कलम १२४ अ नुसार राजद्रोहाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तसेच राज्य सरकारविरुद्ध प्रक्षोभक विधाने करणे, सरकारला आव्हान देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली.

समाजात दरी निर्माण करणे, सरकारला आव्हान देणे यांमुळे राणा दाम्पत्यांविरोधात आम्ही १२४ अ अंतर्गत कलम लावल्याचे त्यांनी सांगितले.

शासन व्यवस्था कोलमडावी व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवावा या उद्देशाने राणा यांनी कृत्य केले होते, त्या अर्थाने हा राजद्रोह होतो. आरोपींना नोटीस देऊन शांतता ठेवा, परत जा, असे आवाहन करण्यात आले होते. मात्र, त्यांनी नोटीस मानली नाही. शिवाय शासनाला आव्हान दिले. त्यातून त्यांचा अप्रामाणिक हेतू दिसून आल्याचे त्यांनी सांगितले.

Exit mobile version