मंत्रालय मुख्य व विस्तार इमारतीमध्ये पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची नियमितपणे साफसफाई करण्यात येते. यापूर्वी २६ एप्रिल २०२६ रोजीच मंत्रालयातील सर्व पाण्याच्या टाक्या साफ करण्यात आल्या होत्या. याबाबत तक्रारीची तात्काळ नोंद घेऊन साडेचार लाख लिटर क्षमतेच्या टाक्यांची पुनश्चः साफसफाई सुरु करण्यात आली असून दोन दिवसांत साफसफाई पूर्ण करण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने कळविले आहे.
तसेच यापूर्वी येथील पाण्याच्या नमुन्यांची तपासणी बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या प्रयोगशाळेतून करण्यात आली आहे, तपासणीअंती २९ एप्रिल २०२६ रोजी पाणी पिण्यासाठी योग्य असल्याबाबतचा अहवाल प्राप्त झाला होता. आता ९ जुलै २०२६ रोजी मंत्रालय इमारतीमधील पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले असून चाचणी अहवाल प्रलंबित आहेत, मुख्य व विस्तारित इमारतीमधील एकूण ३३ जलशुध्दीकरण यंत्रणा याची देखभाल व दुरुस्तीची कार्यवाही करण्यात येत आहेत.
मुख्य इमारतीच्या छतावर १०,००० लिटर क्षमतेच्या ४ व ५००० लिटर क्षमतेच्या ९ टाक्या आहेत. एकूण ८५००० लिटर क्षमतेचा पाणीसाठ्याकरिता १३ टाक्या आहेत. अॅनेक्स इमारतीच्या छतावर कॉक्रिटच्या २०००० लिटरच्या २ व ३००० लिटरच्या ३ व ५००० लिटरच्या १२ टाक्या आहेत. एकूण १०९००० लिटर क्षमतेच्या पाणीसाठ्याकरिता १७ टाक्या आहेत. पाण्याची १ भूमिगत टाकी ४.५० लक्ष लिटर क्षमतेची आहे. पिण्याच्या पाण्याबाबत तक्रारीची तत्काळ नोंद घेऊन ८ जुलै २०२६ रोजी मंत्रालय इमारती मधील भूमिगत व छतावरील पिण्याच्या पाण्याच्या सर्व टाक्या पुनश्चः साफ करण्यासाठी घेतलेल्या आहेत. तसेच सद्यःस्थितीत एका भूमिगत टाकीमधील अस्तित्वातील ४ भागांपैकी २ भागांची सफाई पुर्ण करण्यात आली असून उर्वरित दोन भागांची सफाई आज पूर्ण होत आहे. भूमिगत टाकीचे साफसफाईचे काम पूर्ण करण्यात येईल, असे अधीक्षक अभियंता, मुंबई (सा.बां.) मंडळ, मुंबई यांनी म्हटले आहे.
मागील काही दिवसांपूर्वी मुंबई आणि उपनगरात पावसाने हजेरी लावली. नेमक्या याच कालावधीत विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु होते. तेव्हा मंत्रालयात पाणी पुरवठा करणाऱ्या पाण्यात दुषित पाणी मिसळले. त्यामुळे पाण्याला उंदिर मेल्याचा वास येत होते. त्यामुळे अनेक कर्मचारी हे उलटी आणि लघवीच्या त्रासाने आजारी पडल्याचे उघडकीस आले. त्यामुळे मंत्रालयातील पाण्
