Marathi e-Batmya

नवाब मलिकाच्या आरोपाला क्रांती रेडकरांचे ट्विटने उत्तर

मुंबई: प्रतिनिधी

एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांचा दोन शाळा सोडल्याचे दाखले आज प्रसिध्द करत राष्ट्रवादी काँग्रसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एकच खळबळ उडवून दिली. मात्र मलिक यांनी प्रसिध्द केलेल्या कागदपत्रांना ट्विटने उत्तर देत उत्तरादाखल समीर वानखेडे यांच्या मुळ कागदपत्रांमध्ये दुरुस्ती केलेली कागदपत्रे प्रसिध्द करत वानखेडे हे मुळ हिंदू-महारच असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला.

नवाब मलिक यांनी आज याप्रश्नी सेंट जोसेफ आणि सेंट पॉल शाळेचे दाखले प्रसिध्द केले. त्या शाळेच्या दाखल्यामध्ये समीर वानखेडे यांच्या धर्म-जात या रकान्यामध्ये त्यांचा धर्म मुस्लिम लिहिण्यात आलेला आहे. तर जातीचा कॉलम रिकामा रिक्त ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळे समीर वानखेडे हे प्रथमदर्शनी मुस्लिम असल्याचे दिसून येत आहे.

नवाब मलिक यांनी जाहीर केलेल्या कागदपत्रांना प्रत्युत्तर देताना क्रांती रेडकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून म्हणाल्या की, काही भुतांकडून समीर वानखेडे यांना बदनाम करण्यासाठी अर्धवट माहिती प्रसारीत करण्यात येत आहे. त्यात चुका होत्या. त्यामुळे ज्ञानदेव वानखेडे यांनी १९८९ सालीच या चुका दुरूस्त केल्या. त्या दुरूस्त केलेल्या चुकांची पडताळणी शाळांनी केली आणि त्या स्विकारल्याचे स्पष्ट केले.

सद्यपरिस्थितीत नवाब मलिक यांनी सदरची कागदपत्रे मुंबई उच्च न्यायालयात सादर केलेली आहेत. त्यामुळे उच्च न्यायालय यासंदर्भात काय निकाल देते त्यावरच समीर वानखेडे यांचे आयआरएस म्हणून नोकरीचे भवितव्य अवलंबून आहे.

 

Exit mobile version