Marathi e-Batmya

निखिल गुप्ता औरंगाबादचे नवे पोलिस आयुक्त

मुंबई : प्रतिनिधी

राज्यातील विविध अशा ४० हून अधिक आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यानंतर आज पुन्हा ४ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. औरंगाबादचे पोलिस आयुक्त चिंरजीव प्रसाद यांची बदली नागपूर परिक्षेत्राच्या विशेष महानिरिक्षक पदी करण्यात आली असून त्यांच्या ठिकाणी केंद्रातून प्रतिनियुक्तीवरून परतलेले निखिल गुप्ता यांना औरंगाबादच्या पोलिस आयुक्त पदाची जबाबदारी देण्यात आली. या अनुषंगाने राज्य सरकारकडून आज आदेश जारी करण्यात आले.

त्यांच्याबरोबरच औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरिक्षक रविंद्रकुमार सिंघल यांची बदली वैद्यमापन शास्त्र विभागाच्या नियंत्रक पदावर करण्यात आली. तर नागपूर परिक्षेत्राचे विशेष महानिरिक्षक के.एम.एम.प्रसन्ना यांची बदली औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरिक्षक पदी करण्यात आली.

Exit mobile version