विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून सायंकाळी ५ वाजेपर्यंत राज्यात सरासरी ५८.२२ टक्के मतदान झाले आहे.
विधानसभा निवडणूकीसाठी विदर्भात प्रामुख्याने लढत होती ती काँग्रेस आणि भाजपामध्ये होती. तसेच भाजपाच्या नेत्यांनी आणि काँग्रेसच्या नेत्यांच्या सर्वाधिक सभा या विदर्भातच झाल्या. त्यात काँग्रेस नेते राहुल गांधी, मल्लिकार्जून खर्गे यांच्या सभा झाल्या तर भाजपाकडून देवेंद्र फडणवीस, अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहिर सभाही प्रामुख्याने विदर्भ आणि मराठवाड्यातच झाल्या. त्यानुसार या सर्वाधिक जाहिर सभांचा फायदा काँग्रेसला होणार की भाजपा होणार हे २३ नोव्हेंबर रोजीच उघडकीस येणार आहे.
मात्र पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील मतदानापेक्षा सर्वाधिक मतदानही विदर्भातील जवळपास ८ ते १० जिल्ह्यामध्ये राज्याच्या तुलनेत सर्वाधिक झाल्याचे दिसून येत आहे. भंडारा, बुलढाणा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया आणि यवतमाळ, वर्धा आदी जिल्ह्यात सर्वाधिक मतदान झाल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून दिसून येत आहे. तर मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, हिंगोली, जालना, लातूर, परभणी आदी जिल्ह्यातही चांगले ६० टक्क्याच्या पटीत मतदान झाले.
त्यानंतर उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगांव, नंदूरबार, नाशिक आदी जिल्यात ५० ते ६० टक्केच्या आसपास मतदान झाले. तर पश्चिम महाराष्ट्रात अहमदनगर, कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा जिल्ह्यातही चांगले मतदान झाले. तर मुंबईसह कोकणाचा विचार केला तर मुंबई शहरात कमी मतदान झाले. तर उपनगरातही फारसे म्हणावे तितके मतदान झाल्याचे दिसून आले नाही. तर कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात चांगले मतदान झाले. तर तुलनेने ठाणे जिल्ह्यात ५० टक्केपेक्षा कमी मतदान झाले आहे.
राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :
अहमदनगर – ६१.९५टक्के,
अकोला – ५६.१६ टक्के,
अमरावती -५८.४८ टक्के,
औरंगाबाद- ६०.८३ टक्के,
बीड – ६०.६२ टक्के,
भंडारा- ६५.८८ टक्के,
बुलढाणा-६२.८४ टक्के,
चंद्रपूर- ६४.४८ टक्के,
धुळे – ५९.७५ टक्के,
गडचिरोली-६९.६३ टक्के,
गोंदिया -६५.०९ टक्के,
हिंगोली – ६१.१८ टक्के,
जळगाव – ५४.६९ टक्के,
जालना- ६४.१७ टक्के,
कोल्हापूर- ६७.९७ टक्के,
लातूर _ ६१.४३ टक्के,
मुंबई शहर- ४९.०७ टक्के,
मुंबई उपनगर-५१.७६ टक्के,
नागपूर – ५६.०६ टक्के,
नांदेड – ५५.८८ टक्के,
नंदुरबार- ६३.७२ टक्के,
नाशिक -५९.८५ टक्के,
उस्मानाबाद- ५८.५९ टक्के,
पालघर- ५९.३१ टक्के,
परभणी- ६२.७३ टक्के,
पुणे – ५४.०९ टक्के,
रायगड – ६१.०१ टक्के,
रत्नागिरी- ६०.३५ टक्के,
सांगली – ६३.२८ टक्के,
सातारा – ६४.१६ टक्के,
सिंधुदुर्ग – ६२.०६ टक्के,
सोलापूर -५७.०९ टक्के,
ठाणे – ४९.७६ टक्के,
वर्धा – ६३.५० टक्के,
वाशिम -५७.४२ टक्के,
यवतमाळ – ६१.२२ टक्के मतदान झाले आहे.
