Marathi e-Batmya

विरोधी पक्षांच्या बैठकीनंतर शरद पवार यांनी ट्विट करत दिली ‘ही’ माहिती

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर करण्यात आल्यानंतर देशातील भाजपातेर पक्षांच्या सर्व विरोधी पक्षांची बैठक आज पार पडली. याबैठकीत शिवसेनेचे सुभाष देसाई यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या नावाचा आग्रह राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीतील उमेदवारीसाठी धरला. त्याचबरोबर काँग्रेससह इतर पक्षांनीही त्यांच्या नावावर सहमती दर्शविली.

परंतु या भाजपातेर पक्षांच्या आघाडीचा उमेदवार म्हणून शरद पवार यांच्याऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी असे काही होणार नसल्याचे यापूर्वीच स्पष्ट केले.

या सर्व विरोधी पक्षांच्या बैठकीनंतर शरद पवार यांनी बैठकीचे फोटो शेअर करत म्हणाले की, सर्व विरोधी पक्षांनी घेतलेल्या भूमिकेचे आणि माझे नाव सूचविलेल्या प्रस्तावाचे स्वागत करत ते पुढे म्हणाले की, माझे नाव सुचविल्याबद्दल धन्यवाद. मात्र या प्रस्तावाला माझी सहमती नसून मी राष्ट्रपती पदाची निवडणूक लढविण्यास माझा नम्र नकार आहे.

यापुढेही सर्वसाधारण जनतेसाठी सातत्याने काम करत राहीन असे त्यांनी स्पष्ट केले.

याबैठकीला शरद पवारांसोबत या बैठकीत माजी पंतप्रधान देवगौडा, ममता बॅनर्जी, मल्लिकार्जून खरगे, अखिलेश यादव, मेहबुबा मुफ्ती, सुभाष देसाई, ई करीम, जयराम रमेश, प्रफुल्ल पटेल, टी. आर. बालू , यशवंत सिन्हा, रणदीप सुरजेवाला, प्रियंका चतुर्वेदी( शिवसेना), उमर अब्दुल्ला , राजा आदी १८ नेते उपस्थित होते.

शिवसेनेने काय मांडली भूमिका
भाजपाने घटनेची चौकट मोडण्यास सुरुवात केली आहे. देशाने ७५ वर्षांत जपलेली मूल्ये पायदळी तुडवली आहेत. संविधानिक यंत्रणांचा गैरवापर चालवला आहे. अशावेळी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन राष्ट्रपतीपदासाठी एकमुखाने उमेदवार ठरवावा व निवडून आणावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

भाजपा विरोधातील पक्षांना एकत्र आणण्याची सुरुवात महाराष्ट्राने केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व शरद पवार यांनी ही सुरुवात केली. केवळ राष्ट्रपती निवडीसाठी नव्हे तर सर्व विरोधी पक्षांनी एकजूट मजबूत केली पाहिजे. शरद पवार यांनी ही निवडणूक लढवावी, असा शिवसेनेचा आग्रह आहे.

मात्र शरद पवार यांचा नकार कायम राहिल्यास सर्वसामान्य, उज्वल प्रतिमेचा शक्य झाल्यास राजकीय परिघाबाहेरचा उमेदवार निवडावा. हे देशासाठी प्रतिष्ठेचे पद आहे म्हणून ही निवडणूक महत्वाची आहे अशी भूमिका सुभाष देसाई यांनी मांडली.

 

Exit mobile version