Marathi e-Batmya

अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्र्यांचा आवाज दाबला जातोय

नागपूर : प्रतिनिधी

राज्यातील विविध जिल्हा सरकारी रूग्णालयात औषधांचा पुरेसा पुरवठा होत नसल्याच्या तारांकित प्रश्नी विधानसभेत चर्चा सुरु होती. त्यावेळी यावरील एका उपप्रश्नाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उत्तर देत होते तेव्हा त्यांचा माईक तीन ते चाळ वेळा बंद पडला. नेमका हाच धागा पकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी अध्यक्ष महोदय मुख्यमंत्र्यांचा माईक बंद करून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याची बाब अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या नजरेसमोर आणली.

नेमक्या याच कालावधीत राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील हे मुख्यमंत्र्यांच्या शेजारी येवून बसले. त्यावेळीही अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्या फिरकी घेत, चंद्रकांत दादा इतकी घाई नका करू, पुढचे मुख्यमंत्री तुम्हीच आहात. त्यामुळे त्यांचा माईक बंद पाडण्याचा प्रयत्न करू नका. त्यावर सभागृहात सत्ताधारी आणि विरोधी बाकावरील सर्वच सदस्य हस्स्यकल्लोळात बुडाले.

Exit mobile version