Marathi e-Batmya

वंचितकडून २३ जुलै रोजी ‘महाराष्ट्र बंद’चे आवाहन

काल दिल्लीत शांततेने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष हल्ल्याच्या आणि लाठीचार्जच्या पार्श्वभूमीवर, त्या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आणि पोलिसांच्या या दडपशाहीच्या निषेधार्थ ‘वंचित बहुजन आघाडी’ने २३ जुलै रोजी ‘महाराष्ट्र बंद’चे आवाहन केले.

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सर्व समविचारी पक्ष, विद्यार्थी आणि सर्व स्तरांतील नागरिकांना एकत्र येऊन २३ जुलैच्या ‘महाराष्ट्र बंद’ला पाठिंबा देण्याचे आवाहन केले.

सर्व वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा कमिटी, महिला आघाडी कमिटी, युवा आघाडी कमिटी, सम्यक विद्यार्थी आंदोलन, फुले-शाहू-आंबेडकरी विद्वत सभा यांनी उद्या समविचारी पक्षांच्या प्रतिनिधींना बैठकीसाठी आमंत्रित करून २३ जुलैच्या महाराष्ट्र बंदचे नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

या सर्व कमिट्यांनी विद्यार्थी संघटना, सर्व स्तरांतील व्यक्तींना २३ जुलैच्या ‘महाराष्ट्र बंद’च्या आवाहनात सामील होण्याचे आवाहन करण्याचे निर्देशही देण्यात येत आहेत.

Exit mobile version