Marathi e-Batmya

महाराष्ट्रात २२ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर

२२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी येथे उभारण्यात आलेल्या भव्य मंदिरात श्रीराममललांची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असून, यादिवशी महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ४ जानेवारी २०२४ रोजी केली होती. महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारच्या अध्यादेशाच्या आधारे २२ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

याबाबत राज्य सरकारकडून आज केंद्रीय गृहमंत्रालयाने काढलेल्या अध्यादेशाच्या आधारे आणि महाराष्ट्र सरकारला असलेल्या अधिकारातून अखेर सोमवार दिनांक २२ जानेवारी २०२४ राम मंदिरात बसविण्यात येत असलेल्या मुर्ती प्रतिष्ठाणाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील हिंदूत्वावादी लोकांना उत्साह साजरा करता यावा करीता ही सुट्टी जारी करण्यात आली आहे.

Exit mobile version