Marathi e-Batmya

असदुद्दीन ओवेसी यांनी शपथ घेतल्यानंतर म्हणाले,… जय पॅलेस्टाईन

एआयएमआयएमचे अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी मंगळवारी १८ व्या लोकसभेचे सदस्य म्हणून शपथ घेतल्यानंतर केलेल्या वादग्रस्त घोषणेवर संसदे भाजपाच्या सदस्यांनी गोंधळ घातला. त्यामुळे असादुद्दीन ओवेसी यांचे ते वक्तव्य संसदेच्या कामकाजातून काढून टाकण्यात आले.

असुदुद्दीन ओवेसी यांनी उर्दू भाषेत खासदारकीची शपथ घेतली. त्यांनंतर त्यांनी जय भिम, जय तेलंगणा, जय पॅलेस्टीन आणि जय हिंद अशी घोषणा दिली. असुदुद्दीन ओवेसी यांनी दिलेल्या घोषणेनंतर सत्ताधारी बाकावरील सदस्यांनी गोंधळ घातला. त्यावेळी अध्यक्षस्थानी असलेले राधामोहन सिंग यांनी सदस्यांना आश्वासन दिले की शपथेशिवाय काहीही रेकॉर्डवर जाणार नाही.

प्रो टेम स्पीकर भर्तृहरी महताब म्हणाले की, शपथविधी समारंभात नवनिर्वाचित खासदारांनी वापरलेल्या सर्व घोषणा रेकॉर्डवर घेतल्या जाणार नाहीत आणि त्या काढून टाकल्या जातील.

पाचव्यांदा लोकसभेचे सदस्य म्हणून शपथ घेतलेल्या ओवेसी यांनी नंतर एक्स X वरील एका पोस्टमध्ये सांगितले की ते भारताच्या उपेक्षितांचे प्रश्न प्रामाणिकपणे मांडत राहणार आहे.

असदुद्दीन ओवेसी शपथविधीसाठी गेले असता भाजपा खासदारांनी ‘जय श्री राम’चा नारा देण्यास सुरुवात केली. तर ओवेसी यांनी उर्दूमध्ये शपथ घेतली आणि शपथ घेतल्यानंतर जय पॅलेस्टाईनची घोषणा देऊन ते संपवले.

ओवेसी यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत हैदराबाद मतदारसंघातून भाजपा उमेदवार माधवी लता यांचा ३.३ लाख मतांनी पराभव केला.

भाजपा सदस्यांनी केलेल्या नारेबाजीवरून वाद निर्माण झाला असताना, ओवेसी म्हणाले की, घटनेत अशी कोणतीही तरतूद नाही ज्यामुळे त्यांना प्रतिबंध केला जाईल.

हे कसे चुकीचे आहे? मला संविधानातील तरतुदी सांगा? इतरांनी काय सांगितले ते तुम्हीही ऐकले पाहिजे. मला जे बोलायचे होते ते मी बोललो, असे ओवेसी संसदेबाहेर म्हणाले.

Exit mobile version