Marathi e-Batmya

पाटण येथील नळ पाणी पुरवठा योजनेचे मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन

पाटण येथील केंद्र पुरस्कृत अमृत २.० नळ पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन व मल्हारपेठ येथील लोकनेते बाळासाहेब देसाई ग्रामसचिवालयाचे नूतनीकर इमारतीचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले.

यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, आयुष व आरोग्य कुटुंब कल्याण केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे उपस्थित होते.

या पाणीपुरवठा योजनेची मूळ किंमत १६ कोटी २५ लाख ५६ हजार इतकी आहे. या कामाला २३ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. या पाणीपुरवठा योजनेमुळे १३५ लिटर दरडोई पाणी देण्यात येणार आहे. निविदा प्रक्रिया प्रगतीपथावर असून या योजनेअंतर्गत ११० मिमी ते २५० मिमी व्यासाची ३८. ९९४ किमी. पाईपलाईन असणार आहे. तर ४.४४२ घरगुती नळ जोडण्या आहेत. या पाणीपुरवठा योजनेचे पाटण शहरवासीयांना मुबलक व शुद्ध पाणी मिळणार आहे. याचे भूमिपूजन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले.

मल्हारपेठ येथील ग्रामपंचायत मालकीची तीन मजली इमारत २००१ मध्ये बांधण्यात आली होती. या जुन्या इमारतीवर जन सुविधा योजनेतून ५० लाख खर्चून ग्रामसचिवलयाचे नूतनीकरण करण्यात आले आहे. या सुसज्ज ग्रामसचिवालयामुळे मल्हारपेठ ग्रामस्थांना विविध सुविधा मिळणार आहेत. याचेही लोकार्पण मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले.

या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, नगरपंचायतीचे प्रशासक संतोष मोरे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version