Marathi e-Batmya

छगन भुजबळ यांचा अजित पवार- पटेल यांना इशारा, उठ म्हंटलं की उठायचं आणि बस…

राज्यात मराठा विरूद्ध ओबीसी असा वाद रंगलेला असताना त्यावेळी नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती. तसेच शेवटपर्यंत लोकसभा निवडणूकीतून उमेदवारी जाहिर करण्यावरून महायुतीने एकंदरीत घोळ घालण्यात आल्याचे दिसून आले. परंतु या प्रकरणावर आतापर्यंत मतप्रदर्शन करण्याचे टाळत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मात्र मंत्री पदाच्या यादीतून पत्ता कट केल्यानंतर मात्र यासंदर्भात भाष्य करत राष्ट्रवादी आणि महायुतीवर टीकास्त्र सोडले.

आज पत्रकार परिषदेचे आयोजन छगन भुजबळ यांनी केले होते. या पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की, मी महिनाभर लोकसभा निवडणूकीची चर्चा तयारी करत होतो. मात्र महायुतीच्या लोकांनी ऐनवेळी कच खाल्ली असा अशी उपरोधिक टीका केली. तसेच जे घडलं त्याची माहितीही यावेळी देत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांच्यावर संतापही यावेळी व्यक्त केला.

छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेला सामोरे जाण्याऐवजी त्यांच्या कार्यकर्त्यांची एक बैठक घेतली. यावेळी बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, महायुतीतील वरिष्ठ नेत्यांनी मला सांगितलं होतं की, लोकसभा निवडणूकीला उभे रहा म्हणून, होळीच्या दिवशी ही सगळी चर्चा झाली होती. मला सांगण्यात आलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नाशिकमधून छगन भुजबळ यांना उभा करू, हे जेव्हा मला सांगण्यात आलं तेव्हा मला धक्का बसला. मी सर्वांना सांगितलं की, मला विचार करण्यासाठी थोडा वेळ द्या, मला किमान २४ तास द्या, विचार करून सांगतो. त्यानंतर मी होकार कळवला. मी महिनाभर मतदारसंघात तयारी केली. परंतु देशातील मतदारसंघात उमेदवारांची नावे जाहिर होत होती. महाराष्ट्रातील कित्येक उमेदवारांची नावे जाहिर होत होते. मात्र नाशिक मधून माझं नावं जाहिर केलं नसल्याचं यावेळी सांगितले.

पुढे बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, मी तयारी करत असल्याचे पाहून मतदारसंघातील दलित, मुस्लिम, आदीवासी, व ब्राम्हण संघटनांचे पदाधिकारी मला भेटायला येत होते. या सर्व संघटनां माझ्याबरोबर उभ्या राहिल्या. कारण या सगळ्यांना नाशिकच्या विकासात रस होता. दुसऱ्याबाजूला लोकसभा निवडणूकीसाठी महाराष्ट्रातील जवळपास सर्व नावे जाहिर होते होती. परंतु माझं नावं जाहिर केलं नाही. मग मी महायुतीतील वरिष्ठ नेत्यांना म्हटलं आता मी माघार घेतो, मी तुमच्या निर्णयाकडे आस आणि डोळे लावून बसणार नाही. तुमच्या तिकिटासाठी वाट बघणार नाही. तेव्हा या लोकांनी कच खाल्ली आणि तिकीट दिलं नाही असा उपरोधिक टोलाही यावेळी लगावला.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांनी छगन भुजबळ यांच्याबाबत बोलताना म्हणाले की, छगन भुजबळ यांना राज्यसभेवर जायचं होतं, त्यासाठी आम्ही राज्यसभेवर पाठविण्याची तयारी केली आहे. त्यावर छगन भुजबळ यांनी प्रफुल पटेल यांच्या वक्तव्यावर संताप व्यक्त करत म्हणाले की, सहा महिन्यापूर्वी मला राज्यसभेवर जायचे होते, तेव्हा मला नकार देण्यात आला. आता मी आमदार म्हणून निवडूण आल्यानंतर मला राज्यसभेवर जायला सांगतात. मी तुमच्या हातातंल खेळण आहे का असा संतप्त सवालही प्रफुल पटेल यांना केला.

पुढे बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, सहा महिन्यांपूर्वी मला नक्कीच राज्यसभेवर जायचं होतं, तशी इच्छा मी वरिष्ठासमोर व्यक्त केली होती. परंतु तेव्हा त्यांनी नकार देत आता आपण सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवत आहोत. त्यावर माझी हरकत नव्हती. त्यानंतर मकरंद पाटील यांच्या भावाला राज्यसभेवर पाठविण्याचा निर्णय घेतला, तेव्हा देखील मी राज्यसभेचा विषय काढला होता, पण वरिष्ठांनी नकार दिला. त्यांनी सांगितलं की, आम्ह मकरंद पाटील यांना शब्द दिला आहे., तेव्हा मला सांगण्यात आल तुम्ही विधानसभेची निवडणूक लढविली पाहिजे, तुमच्याशिवाय येवला मतदारसंघात विजय मिळणं कठीण असल्याचे सांगत तुम्ही निवडणूक लढवित असाल तर आमले कार्यकर्त्ये जोमाने काम करतील. त्यावर मी हरकत घेतली नाही. त्यानंतर विधानसभा निवडणूकीत मी व माझ्या कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली, आणि विधानसभा निवडणूक जिंकली. आता ते लोक म्हणतात, आपण मकरंद पाटील यांना मंत्री केलं आहे. आता त्याच्या भावाला आपण राजीनामा द्यायला सांगू आणि तुम्हाला आपण राज्यसभेवर पाठवू. पण त्यासाठी मला विधानसभेचा राजीनामा द्यावा लागेल. मी जर असं केलं तर माझ्या मतदारसंघातील लोकांची प्रतारणा केल्यासारखं होणार नाही का असा सवाल उपस्थित करत मी तुमच्या हातातील खेळणं आहे का असा सवालही यावेळी केला.

अजित पवार आणि प्रफुल पटेल यांच्यावर जाहिर नाराजी व्यक्त करत म्हणाले की, मला त्यांना विचारायचे आहे, मी तुमच्या हातातील खेळणं आहे का असा सवाल उपस्थित करत तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही मला म्हणालं की, राज्यसभेवर जा, तुम्ही म्हणालं तेव्हा बसायचं, तुम्ही म्हणाल तेव्हा उठ म्हठलं की उठायचं, जेव्हा म्हणालं तेव्हा निवडणूक लढवायची, ते सगळं मी जर उद्या राजीनामा दिला तर तर माझ्या मतदारसंघातील लोकांना काय वाटेल, ज्या कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी मेहनत घेतली त्यांना काय वाटेल, त्यांनी माझ्यासाठी जीवाचं रान केले, आता निवडणूक झाल्यानंतर महिनाभरात राजीनामा कसा देऊ, उलट मी माझ्या वरिष्ठांना म्हटलं की, थोडं थांबा माझ्या मतदारसंघातील कामे पूर्ण करू द्या, एक दोन वर्षांनी आपण याचा विचार करू. परंतु तुम्ही म्हणालं तसं उठ म्हटलं की उठायचं आणि बस म्हटलं की बसायचं असा छगन भुजबळ तसा माणूस नाही असा इशाराही यावेळी दिला.

Exit mobile version