Marathi e-Batmya

मुख्यमंत्री शिंदे यांचे विठ्ठलाला साकडे, राज्यात उत्तम पाऊस पडू दे

आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरच्या विठ्ठल रखुमाई मंदिरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते विठ्ठलाची शासकीय पूजा संपन्न झाली.
यंदा नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील शेतकरी बाळू शंकर अहिरे आणि आशाबाई बाळूPandh अहिरे यांना मानाचे वारकरी म्हणून शासकीय पूजेला बसण्याचा मान मिळाला. त्यांच्यासोबत पूजा करणे हे आपले सौभाग्य असल्याचे मत मुख्यमंत्री शिंदे यांनी या पूजेनंतर व्यक्त केले.

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरचे वातावरण भक्तीमय झालेले आहे सर्वजण पांडुरंगाच्या भक्तीमध्ये भान हरपून गेलेले आहेत. हे बा… विठ्ठला माझ्या बळीराजाला सुखी ठेवकष्टकऱ्यांच्या व सामान्यांच्या जीवनात समृद्धी येऊ देप्रत्येकाचे दुःख दूर कर,असे साकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विठ्ठलाच्या चरणी घातले.

         आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीची महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटीलमहसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटीलग्रामविकास मंत्री गिरीश महाजनआरोग्य मंत्री डॉ तानाजी सावंतशालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधवखासदार श्रीकांत शिंदेआमदार सर्वश्री समाधान आवतडे, सचिन कल्याणशेट्टी, भरत गोगावलेजिल्हाधिकारी कुमार आशीर्वादपोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडेमंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकरकार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके व अन्य मान्यवर उपस्थित होते.

  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, हे सरकार सर्वसामान्याचे आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या जीवनात सुख समृद्धी येण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. आजच्या दिवशी पांडुरंगाला एकच प्रार्थना आहे, की राज्यातील शेतकरीकामगार व कष्टकरी सुखी झाला पाहिजे. यासाठी हे शासन सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनामुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनाबेरोजगार तरुणांसाठी मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना आदी योजनांच्या माध्यमातून शासन सर्वसामान्यांचे जीवन सुखकर करण्याचा प्रयत्न करीत आहे.

      मागील आषाढी वारीच्या तुलनेत यावर्षी २५ ते ३० टक्के वारकरी संख्या वाढलेली आहे त्यामुळे सर्वत्र एक भक्तीमय वातावरण झालेले आहे. वारकरी संप्रदाय भागवत धर्माची पताका सदैव फडकवत ठेवत असून अशा वारकऱ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी शासन सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देत आहे.शासनाने वारकरी महामंडळाची स्थापना केली असून वारीतील दिंड्यांना अनुदान देण्यात आलेले आहे. जिल्हा प्रशासनाला आषाढी वारीनिमित्त देण्यात येणाऱ्या निधीमध्ये  तिपटीने वाढ केलेली आहे. पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा सर्वांच्या संमतीनेच केला जाणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली.

         विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या संवर्धनासाठी ७३ कोटी ८० लाखाचा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत सुरू असलेली सर्व कामे उत्कृष्ट असून मंदिराला पूर्वीचे वैभव प्राप्त होत आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शन मंडप व टोकन दर्शन पद्धत ही तिरुपती बालाजी मंदिराच्या धर्तीवर राबविण्यासाठी जिल्हा प्रशासन व मंदिर समितीने तयार केलेल्या १०३ कोटीच्या आराखड्याला मान्यता देण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. मंदिर समितीचा एमटीडीसीसोबत असलेला करार पुढेही वाढविण्यात येईल. तसेच भाविकांना सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. त्याप्रमाणे मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांच्या सर्व अडीअडचणी सकारात्मक दृष्टीने सोडवण्यात येतील, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

        आषाढी वारीनिमित्त आरोग्य विभागाच्यावतीने चार ठिकाणी महाआरोग्य शिबिराचे आयोजन केलेले असून आतापर्यंत ८ लाख नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला आहे. तसेच १५ लाख  नागरिक या आरोग्य सुविधांच्या लाभ घेतीलअशी अपेक्षा आहे. तसेच पंढरपूर येथे देश-विदेशातून लाखो भाविक येतात. त्यांच्यासाठी आरोग्य सुविधांबाबत कोणतीही कमतरता राहू नये, यासाठी लवकरच एक हजार खाटांची  क्षमता असलेले नवीन रुग्णालय उभारण्यात  येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिली.

मानाचे वारकऱ्यांचा सन्मान

          शेतकरी श्री. बाळू शंकर अहिरेवय ५५ वर्षेसौ. आशाबाई बाळू अहिरे वय ५० वर्षे. (मु. पो. अंबासनता. सटाणा जि. नाशिक) यांचा सन्मान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. यावेळी एसटी महामंडळाकडून मानाच्या वारकऱ्यांना एक वर्ष मोफत एसटी बस सवलत पास मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आला. हे मानाचे वारकरी मागील १६ वर्षापासून नियमितपणे वारी करीत आहेत.

श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कार

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने देण्यात येणारे श्री. विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कार देण्यात आले. संत तुकाराम महाराज वंशज देहूकर दिंडी श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळादेहू यांना एक लाखाचा प्रथम पुरस्कार मिळाला. दानेवाला निकम दिंडी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा पुणे यांना ७५ हजार रुपयांचा द्वितीय  पुरस्कार तर गुरु बाबासाहेब आजरेकर दिंडी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळाइंदापूर यांना ५० हजार रुपयांचा तृतीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. या सर्व पुरस्कारांचे वितरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते करण्यात आले.

आरोग्यदूतचे प्रकाशन-

        श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने प्रतिवर्षी प्रकाशित करण्यात येणारे आरोग्यदुत या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मान्यवरांच्या हस्ते पार पडले. यावेळी मेगडंबरीसाठी दोन कोटी ४५ लाख रुपयाचे चांदी दान करणाऱ्या उद्योजक सुनील मोरगे यांचाही  मुख्यमंत्र्यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. प्रारंभी आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या पत्नी सौ. लता एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महापूजा पार पडली.

Exit mobile version