मुंबईसह पुण्यातही पावसाची दमदार हजेरी आहे. त्यामुळे मुंबईसह पुण्यातही नागरिकांचे प्रचंड नुकसान आणि जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यातच आता काही दिवसांववर आषाढी वारी आल्याने या वारीसाठी देहू येथील संत तुकारामाची पालखी आणि आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढरपूरला जाण्याच्या तयारीत आहेत. मात्र भारतीय हवामान विभागाकडून पावसाचा वारंवार इशारा देत आहे. त्यामुळे वारीतील काही पालख्या आणि वारकरी पुण्यातून वारीसाठी सुरुवात करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी आळंदी आणि देहूच्या पालखी आणि वारकऱ्यांनी पुण्यातच वारीमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन केल.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, इंद्रायणी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला असून आळंदी शहरात प्रवेश करणारे नदीवरील चारही पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे सध्या आळंदी शहरात येणे सुरक्षित नाही. ज्या वारकरी व भाविकांनी आळंदीच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे, त्यांनी ज्या ठिकाणी आहात, त्या ठिकाणीच सुरक्षित थांबावे. देहू व आळंदी येथे न जाता पुणे शहरात वारीमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.
शेवटी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, प्रशासन, पोलीस यंत्रणा व आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच नदीपात्र, घाट परिसर व बंद करण्यात आलेल्या पुलांकडे जाणे टाळावे. आपल्या सुरक्षिततेसाठी प्रशासन आवश्यक ती सर्व उपाययोजना करत आहे. सर्वांनी संयम बाळगून प्रशासनाला सहकार्य करावे. काही वारकरी बांधव पुणे शहरापर्यंत आले असल्यास त्यांनी पुणे शहरातच थांबावे, असेही आवाहनही यावेळी केले.
