Marathi e-Batmya

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या, रात्रभर झोपले नाही…

आरजी कार रूग्णालयातील दुर्घटनेप्रकरणावरून सुरु झालेले आंदोलन काही केल्या थांबायला तयार नागी. रूग्णालयाशी संबधित डॉक्टर्स आणि काही वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात दोषी व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी सातत्याने लावून धरत आहे. याप्रश्नी आंदोलकांच्या भावनांचा आदर करत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवित आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले. तसेच शनिवारी ज्युनियर डॉक्टर निषेध करीत असलेल्या ठिकाणी भेट दिली आणि प्रशिक्षणार्थी डॉक्टरवरील अत्याचार प्रकरणी एखाद्याला दोषी ठरविल्यास ती त्यांच्या मागण्यांकडे लक्ष देईल आणि कारवाई करेल याची खात्री दिली.

आरजी कार बलात्कार-खून प्रकरणावरील गतिविधीचे निराकरण करण्यासाठी आंदोलन करणार्‍या डॉक्टरांशी झालेल्या बैठकीसाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्य सचिवालय, नाबन्ना येथे दोन तास थांबल्यानंतर दोन दिवसांनी बॅनर्जी त्यांनी अचानक भेट दिली. यावेळी आंदोलक डॉक्टरांनी वुई वॉट जस्टीसच्या घोषणा देत होते.

यावेळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, मी आज येथे आलेय ती मुख्यमंत्री म्हणून नव्हे तर डॉक्टरांची दीदी मोठी बहिण म्हणून भेटायला आले आहे. माझे पद मोठे नाही तर लोकांची जनता जनार्दनाचे पद मोठे आहे. काल रात्री मी झोपले नाही कारण तुम्ही सर्वांनी या मुसळधार पाऊसातही आंदोलन सुरु ठेवलात. त्यामुळे तुम्हाला सांगण्यासाठी-भेटण्यासाठी येथे आले आहे. कृपया हे तुम्ही करू नका असे आवाहन करत म्हणाल्या की, राज्यातील रूग्णांशी संबधित रूग्णालयाच्या कल्याण समित्या त्वरित बरखास्त करण्यात येत असल्याचे जाहिर केले. तसेच अडचणीचे संकटाचे निराकरण करण्याचा हा माझा शेवटचा प्रयत्न असल्याचेही यावेळी सांगितले.

यावेळी आंदोलकांकडून सातत्याने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या बोलत असतानाही घोषणाबाजी करण्यात येत होती. त्यानंतर आंदोलकांच्या ठिकाणाहून मुख्यमंत्री बॅनर्जी या निघून गेल्यानंतर डॉक्टरांनी सांगितले की चर्चा होईपर्यंत ते त्यांच्या मागण्यांवर तडजोड करण्यास तयार नाहीत.

कोलकाता येथील राज्य आरोग्य विभागाचे मुख्यालय स्वास्थ भवनच्या बाहेर डॉक्टर तळ ठोकत आहेत, ज्यात राज्य-रुग्णालयात अधिक चांगली सुरक्षा आणि आरजी येथे डॉक्टरांच्या बलात्कार व खून या विषयावर उच्च अधिकाऱ्यांच्या सुरक्षा काढून टाकण्यासह मागणीची यादी आहे.

Exit mobile version