Breaking News

संजय गायकवाड यांचे वादग्रस्त वक्तव्य, राहुल गांधी यांची… ११ लाखाचे बक्षिस सत्ताधाऱी आमदाराकडूनच पातळी सोडून वक्तव्य

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे आमदार संजय गायकवाड हे मागील काही दिवसांपासून काही ना काही वक्तव्ये करत प्रसार माध्यमांच्या चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र या आज संजय गायकवाड यांनी त्यांच्या आचरटपणाची हद्द ओलांडत थेट राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्या व्यक्तीस ११ लाख रूपयांचे बक्षिस देणार असल्याचे वादग्रस्त वक्तव्य केले. संजय गायकवाड यांच्या या वादग्रस्त वक्तव्याने राज्यात एकच खळबळ उडाली असून या वक्तव्याचे पडसाद राज्याबरोबर दिल्लीतही उमटले आहेत.

बुलढाणा येथे काही निवडक प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय गायकवाड यांनी वादग्रस्त विधान केले. राहुल गांधी यांच्या या कथित आरक्षण विरोधी वक्तव्यामुळे काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला आहे. त्यांना अनुसूचित जाती-जमाती, इतर मागासवर्गीय यांचे आरक्षण संपवायचे आहे. देशात आणि राज्यात आरक्षणावरून आग भडकवली जात असताना राहुल गांधी यांनी विदेशात जाऊन हे विधान करून आरक्षण विरोधी भूमिका मांडली असल्याचे म्हणाले.

पुढे बोलताना संजय गायकवाड म्हणाले की, याचा अर्थ आरक्षण संपवायचे आहे, दलित, आदिवासी, ओबीसी यांना पुढारलेल्या जातींसोबत येण्याची, आर्थिक-शैक्षणीक प्रगती साधण्याची संधी मिळावी यासाठी राज्यघटनेच्या माध्यमातून आरक्षण दिले आहे. मात्र राहुल गांधी यांनी परदेशातील भूमिवर आरक्षण विरोधी भूमिका मांडली. त्यामुळे राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्या माझ्याकडून ११ लाख रूपयांचे रोख बक्षिस देईन अशा वादग्रस्त विधानाचा पुर्नरुच्चार केला.

संजय गायकवाड पुढे बोलताना म्हणाले की, लोकसभा निवडणूकीच्या प्रचारात याच नेत्याने त्यांच्या काँग्रेस पक्षाने भाजपा पुन्हा सत्तेत आली तर राज्यघटना बदलेले, आरक्षणाला धोका आहे असा फेक नॅरेटीव्ह तयार केला. आता राहुल गांधी यांनी आरक्षण विरोधी भूमिका मांडली असून त्यांचा दलित आदिवासी बद्दलचा कळवळा वरवरचा असल्याचा आरोपही केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत