Marathi e-Batmya

काँग्रेस मधून आ.अब्दुल सत्तार यांची हकालपट्टी

जालना : प्रतिनिधी
काँग्रेस पक्षाच्या पक्षाविरोधात भूमिका केल्यामुळे सिल्लोड मतदार संघाचे आमदार अब्दुल सत्तार यांची पक्षातून हकालपट्टी केल्याची अधिकृत घोषणा माजी मुख्यमंत्री तथा प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी भोकरदन येथे जालना लोकसभेचे काँग्रेस उमेदवार विलास औताडे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत केली.
काँग्रेस मध्ये असताना त्यांना मानसन्मान दिला. मात्र त्यांनी पक्ष विरोधात भूमिका घेत आपली वागणूक सुरू ठेवली आणि ही वागणूक पक्षाला घातक असून उमेदवारांनाही त्रासदायक ठरत आहे. अब्दुल सत्तार यांना मान सन्मान दिला मंत्रिपदही दिले. या लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराविरोधात प्रचार केल्याचे सांगत त्याची गंभीर दखल घेऊन काँग्रेस पक्षातून अधिकृतरीत्या हकालपट्टी करण्यात येत असल्याची घोषणा भोकरदन येथील जाहीर सभेत त्यांनी केली.

Exit mobile version