Marathi e-Batmya

महिला काँग्रेसच्या प्रदेश आणि जिल्हा, ब्लॉक समित्या तात्काळ विसर्जित

अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अलका लांबा यांच्या आदेशाने महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या राज्य, जिल्हा आणि ब्लॉक स्तरीय सर्व समित्या तत्काळ प्रभावाने विसर्जित करण्यात आल्या आहेत. संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी आणि महाराष्ट्र राज्यातील महिला काँग्रेसच्या सदस्यत्व मोहिमेला गती देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षापदी संध्या सव्वालाखे या कायम राहून नवीन समित्या स्थापन करण्याच्या प्रक्रियेचे नेतृत्व करणार आहेत. राज्यातील महिला काँग्रेसची सदस्य मोहीम पुढे नेण्यासाठी आणि नारी न्याय सभासदत्व सत्कार समारंभ आयोजित करणे आणि महाराष्ट्रातील महिला काँग्रेस संघटनेच्या उभारणीसाठी संध्या सव्वालाखे यांच्या सोबत खालील विधानसभा क्षेत्रातील महिला पदाधिकारी सहकार्य करणार आहेत.

१) दिपाली लालाजी मिसाल – संभाजीनगर २) आयशा अस्लम खान – ठाणे ३) डॉ. अंजली ठाकरे -अमरावती ४) सुनीता गावंडे- रामटेक ५) सीमा विनोद सहारे- गढचिरोली चिमूर ६) स्वाती राजेश जाधव – नाशिक ७) साक्षी एस. वंजारी – रत्नागिरी-सिंधुदुर्ग ८) सीमा महेश आहूजा – कल्याण ९) सुषमा शरदचंद्र राजेघोरपडे – सातारा.

Exit mobile version