Marathi e-Batmya

सोमय्या ना, त्यांच्या वक्तव्याला गंभीरतेने घेण्याची गरज नाही

मुंबई : प्रतिनिधी

भाजपाचे नेते किरीट सोमय्या हे बेजबाबदार वक्तव्य करण्यासाठी प्रसिध्द असल्यानेच मागील लोकसभा निवडणुकीत त्यांच्याच पक्षाने त्यांचे तिकीट कापले, त्यामुळे किरीट सोमय्या यांच्या वक्तव्याला गंभीरतेने घेण्याची गरज नसल्याची उपरोधिक

टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी करत वाधवान प्रकरणी योग्य ती चौकशी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. वाधवान प्रकरणी बातमी आल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन त्या प्रकरणाची चौकशी लावण्याचा निर्णय घेतला आहे. अमिताभ गुप्ता यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

मात्र भाजपाचे नेते किरीट सोमय्या ज्यापध्दतीने बोलत आहेत ते बेजबाबदारपणाचे आहे. आयएएस, आयपीएस अधिकारी पंतप्रधान कार्यालयाच्या अधीन येतात. त्यामुळे केंद्राला वाटत असेल तर ते कारवाई करू शकतात असेही आव्हानही त्यांनी यावेळी भाजपाला दिले.

Exit mobile version