Marathi e-Batmya

अनलॉक ३: आता केंद्रानेही दिली राज्यांतर्गत प्रवासाची मोकळीक

नवी दिल्ली- मुंबई: प्रतिनिधी

गणेशोत्सव आणि राज्यातील जनतेला आणखी मोकळीक देण्याच्या उद्देशाने missionbeginagain अंतर्गत राज्यात एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास करण्याची परवानगी राज्य सरकारने नुकतीच दिली. त्यापाठोपाठ आता राज्यातंर्गत प्रवासास केंद्राने परवानगी अनलॉक-३ अंतर्गत आज परवानगी दिली.त्याचबरोबर त्यासाठी कोणत्याही परवानगीची असलेली अटही काढून टाकण्यात आली. त्यामुळे आता एका राज्पातून दुसऱ्या राज्यात रवानगीशिवाय प्रवास करता येणार आहे.

काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने मिशन बिगेन अगेन अंतर्गत राज्यातंर्गत एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास करण्यासाठी परवानगी देत एसटी प्रवास करण्यासही मान्यता दिली. याशिवाय एस.टी प्रवास करताना कोणत्याही परवानगीची अर्थात ई-पासची गरज नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे गेले पाच महिने एकाच जिल्ह्यात अडकलेल्या अनेकांना दिलासा मिळाला. तसेच आता एका राज्यातून दुसऱ्या राज्यात प्रवास करण्यासही केंद्राने परवानगी दिली. तसेच या प्रवासाला कोणत्याही परवानगीची असलेली अट काढून टाकली.

Exit mobile version