मुंबई : प्रतिनिधी
राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता १ जानेवारी २०१८ पासून १३९ वरून १४२ इतका करण्यात आला होता. तसेच ऑक्टोबर २०१८ च्या वेतनात या महागाई भत्त्याची रक्कम रोखीने देण्याचे आदेश यापूर्वीच निर्गमित करण्यात आले होते. ९ महिन्याच्या थकबाकीचा निर्णय प्रलंबित होता. मात्र आता तो रोखीने देण्याचा निर्णय घेण्यात आला असून पुढील महिन्यात थकीत रक्कम देण्यात येणार असल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
आता १ जानेवारी ते ३० सप्टेंबर २०१८ या ९ महिन्याच्या कालावधीची ३ टक्के महागाई भत्त्याची थकबाकी ची रक्कम ही ऑक्टोबर २०१८ च्या वेतनात रोखीने देण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत अशी माहिती अर्थ मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. या बाबतचा शासन निर्णय आज दि. २९ ऑक्टोबर २०१८ रोजी वित्त विभागाने निर्गमित केल्याचेही मुनगंटीवार यांनी सांगितले
वाढीव महागाई भत्त्याची ९ महिन्याची थकबाकी ऑक्टोबरच्या वेतनात देणार
