Marathi e-Batmya

हरियाणा भाजपा प्रदेशाध्यक्षाने पत्र लिहिताच निवडणूक आयोगाने निवडणूकीची तारीख बदलली

पाचवर्षी हरियाणा आणि महाराष्ट्राची निवडणूक एकदम घेण्यात आली. परंतु यावेळी महाराष्ट्र विधानसभेची मुदत पूर्ण होण्यास आणि महाराष्ट्रात सणासुदीचे दिवस असल्याचे कारण पुढे करत केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूका दिवाळीत घेण्याचे संकेत दिले. तसेच हरियाणा आणि जम्मू आणि काश्मीरच्या निवडणूका एकत्रित घेत असल्याचे जाहिर केले. या घोषणेला काही दिवसांचा अवधी लोटत नाही तोच भाजपाच्या हरियाणा प्रदेशाध्यक्षाने केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहीत अमोज अमावास्याची आठवण करून देत निवडूकीच्या मतदानाची ताऱीख बदलण्याची मागणी केली. भाजपा प्रदेशाध्यक्षाने केलेली मागणी केंद्रीय निवडणूक आयोगाने तातडीने मान्य करत हरियाणा विधानसभा निवडणूकीची तारीख लगेच बदलल्याचे आदेश जारी केले.

केंद्रीय निवडणूक आयोगाने (ECI) हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची तारीख बदलून ती १ ऑक्टोबर वरून ५ ऑक्टोबर २०२४ अशी केली आहे. त्यानंतर, जम्मू आणि काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांसाठी मतमोजणी आणि निकाल ५ तारखेऐवजी ८ ऑक्टोबर रोजी जाहिर करण्यात येणार असल्याचे जाहिर केले. केंद्रीय निवडणूक आयोगाने भाजपा प्रदेशाध्यक्षाने पाठविलेल्या पत्राचा आधार घेत मतदानाचा हक्क आणि बिश्नोई समाजाच्या सांस्कृतिक परंपरा या दोन्हींचा सन्मान करण्यासाठी तारखांमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, ज्याने त्यांचे गुरु जांभेश्वर यांच्या स्मरणार्थ असोज अमावस्या उत्सवात भाग घेण्याची शतकानुशतके जुनी प्रथा कायम ठेवली असल्याचे स्पष्टीकरणही दिले.

“शताब्दी जुन्या असोज अमावस्या उत्सवात सहभागी होण्यासाठी हरियाणातील बिश्नोई समाजाच्या लोकांच्या मोठ्या आंदोलनाबाबत राष्ट्रीय राजकीय पक्ष, राज्य राजकीय पक्ष आणि अखिल भारतीय बिश्नोई महासभा यांच्याकडून पत्र पाठविण्यात आल्याचे प्राप्त झाल्याची माहिती निवडणूक आयोगाने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे. या अमोज अमावस्येसाठी मोठ्या संख्येने लोकांचा मतदानाचा हक्क नाकारला जाऊ शकतो आणि हरियाणा विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांचा सहभाग कमी होऊ शकतो, असे सांगण्यात आले आहे.

यावर्षी, असोज अमावस्या सण २ ऑक्टोबर रोजी येतो आणि सिरसा, फतेहाबाद आणि हिसार येथे राहणारी हजारो बिश्नोई कुटुंबे त्या दिवशी राजस्थानला जातात. अगदी भाजपानेही याआधी निवडणूक आयोगाला १ ऑक्टोबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक फेरनिश्चित करण्याचे आवाहन केले होते, कारण सुट्ट्यांमुळे मतदान कमी होऊ शकते. हरियाणा भाजपाचे प्रमुख मोहन लाल बडोली यांनी त्यांच्या पत्रात असा युक्तिवाद केला आहे की १ ऑक्टोबरच्या आसपासच्या आठवड्यात अनेक लोक सुट्टीवर जाण्याचा कल असून ज्यामुळे मतदारांच्या सहभागावर परिणाम होऊ शकतो.

हरियाणा विधानसभा निवडणूकीची बदलेली तारखेचे आयोगाचे नियोजनः-

तत्पूर्वी, निवडणूक पॅनेलने १६ ऑगस्ट रोजी घोषित केले होते की हरियाणामध्ये विधानसभा निवडणुका १ ऑक्टोबर रोजी एकाच टप्प्यात होतील आणि निकाल ४ ऑक्टोबर रोजी घोषित केला जाईल असे वेळा पत्रक जाहिर करण्यात आले होते.

Exit mobile version