मुंबईः प्रतिनिधी
देशात १०० टक्के आर्थिक मंदी असताना देशाचे पंतप्रधान मोदी जाहिरातीवर पैसे खर्च करून सरकारचे १०० दिवस साजरे करण्यात मश्गुल आहेत अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे. मोदी सरकारचे १०० दिवस यावर बोलताना त्यांनी मोदींवर निशाणा साधला.
देशातील लोकांच्या नोकर्या जात आहेत. जीडीपी ५ टक्क्यावर आला आहे. लहान- लहान कंपन्या बंद होत आहेत. या आर्थिक मंदीवर उपाययोजना करण्याऐवजी सरकारचे १०० दिवस कसे गेले यावर जाहिराती करत आहेत असा आरोपही त्यांनी केला.
देशावर आर्थिक मंदी का आली? देशावरील कर्ज ५२ लाख कोटीच्यावर जावून ८४ लाख कोटी कसे झाले? देशावर आर्थिक संकट असताना रशियाला ७२ हजार कोटी कसे काय दिले? ही भाजप सरकारची १०० दिवसातील कामगिरी असून याचंही उत्तर मोदींनी जनतेला दिले पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली.
देशात मंदी असताना मोदी जाहिरातीवर पैसे खर्च करण्यात मश्गुल
