Marathi e-Batmya

रोहिणी खडसे-खेवलकर कोरोना पॉझिटीव्ह

मुक्ताईनगर-मुंबई : प्रतिनिधी

भाजपामध्ये होत असलेल्या घुसमटी आणि अन्यायामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वडील एकनाथ खडसे यांच्यासोबत प्रवेश केलेल्या रोहिणी खडसे-खेवलकर या कोरोना पॉझिटीव्ह आल्याची माहिती त्यांनी स्वत: ट्विटरवरून दिली.

तसेच खबरदारीचा उपाय म्हणून आपण रूग्णालयात दाखल होत असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच आपली तब्येत उत्तम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Exit mobile version